Mahadev Jankar Exclusive : भविष्यात पुन्हा भाजपसोबत जाणार? महादेव जानकर स्पष्टच म्हणाले

Mahadev Jankar : दोन दिवसापूर्वी भाजपसोबत जाऊन आपण इतिहासातील सर्वात मोठी चूक केली होती असं रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले होते. यानंतर महादेव जानकर भाजपवर (BJP) नाराज असून भविष्यात महादेव जानकर भाजपसोबत जाणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु होती. तर आता लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, मला भाजपवर काही राग नाही. आम्ही आता पक्ष वाढवण्याचा काम करत आहोत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मला त्यांचा मुलगा मानला होता. मी फक्त मुंडे साहेबांमुळे भाजपसोबत गेलो. भाजपने आम्हाला मंत्रिपद देखील दिले. मात्र त्यांनी पक्ष वाटा आम्हाला दिला नसल्याने आमची आणि त्यांची युती तुटली. आता आम्ही आमची ताकद वाढत आहोत. पक्षाची ताकद वाढली तर भाजप असो किंवा काँग्रेस आमच्यासोबत स्वतःहून येणार त्यामुळे आम्ही आता पक्ष वाढवणार असल्याची माहिती लेट्सअप मराठीशी बोलताना महादेव जानकर यांनी दिली.
तर दुसरीकडे यावेळी त्यांनी मराठी विजय मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कॉल केल्यानंतर मी विजय मेळाव्यात सहभागी झालो. दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आल्याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यात आमची त्यांच्यासोबत युती देखील होऊ शकते असे संकेत देखील त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना दिले.
लवकरच एसटीचे रिटेल (किरकोळ) इंधन विक्रीत पदार्पण; प्रताप सरनाईक
सुप्रिया सुळे देखील माझी बहीण
तर यावेळी महादेव जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल (Supriya Sule) बोलताना ज्याप्रमाणे पंकजा मुंडे (Pankaja Munde) माझी बहीण आहे त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे देखील माझी बहीण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो याची देखील आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.