तामिळनाडूत भाजपला दणका! CM स्टॅलिनची भेट अन् पन्नीरसेल्वम NDA तून बाहेर; काय घडलं?

Tamil Nadu Politics : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम (ओपीएस) यांच्या नेतृत्वातील एआयएडीएमके कॅडर राइट्स (Tamil Nadu Politics) रिट्रीवल कमिटीने आज एक मोठा निर्णय घेतला. या कमिटीने भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. ओ पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ही घोषणा केली. तामिळनाडूत आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
तामिळनाडूत पुढील वर्षात विधानसभेच्या (Tamil Nadu Elections) निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होऊ लागली आहेत. माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचे निकटवर्तीय पनरुट्टी एस रामचंद्रन यांनी एनडीएतून वेगळे होत असल्याची घोषणा केली. आमचा गट भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीतून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम देखील उपस्थित होते.
ठाकरे बंधूंचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन! विजयी मेळ्यावर काय म्हणाले?
रामचंद्रन पुढे म्हणाले, आगामी निवडणुका लक्षात घेता ओपीएस लवकरच राज्याचा दौरा करणार आहेत. सध्यातरी आम्ही कोणत्याही पक्षाबरबरोबर आघाडी करणार नाही. निवडणुका जवळ आल्यानंतर यावर निर्णय घेऊ. यातच पन्नीरसेल्वम यांनी तामिळ अभिनेता विजयच्या (Actor Vijay) पक्षाशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाकारली नाही. आम्ही कुणाबरोबर आघाडी करणार याचं उत्तर येणारा काळच देईल. निवडणुका अजून लांब आहेत असे रामचंद्रन यांनी स्पष्ट केले.
पन्नीरसेल्वम एआयएडीएमके पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. पक्षांतर्गत नेतृत्वाच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद झाल्याने त्यांनी स्वतःचा नवा गट तयार केला होता. दरम्यान, पन्नीरसेल्वम यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला होता. यामुळे पन्नीरसेल्वम नाराज झाले होते. यानंतर त्यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या (एसएसए) निधी वितरणात विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली होती.
महाराष्ट्रात मराठीच! भाषा वादात तामिळनाडू्च्या मुख्यमंत्र्यांची उडी; म्हणाले, “आता PM मोदींनी..”