महाराष्ट्रात मराठीच! भाषा वादात तामिळनाडू्च्या मुख्यमंत्र्यांची उडी; म्हणाले, “आता PM मोदींनी..”

महाराष्ट्रात मराठीच! भाषा वादात तामिळनाडू्च्या मुख्यमंत्र्यांची उडी; म्हणाले, “आता PM मोदींनी..”

MK Stalin on Marathi Language : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तामिळनाडू राज्यातून सर्वाधिक विरोध होत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही हिंदी विरोधाचे स्वर तीव्र झाले आहेत. राज्यात मराठी भाषेलाच प्राधान्य राहील असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या वादात आता थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उडी घेतली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भूमिकेचे समर्थन करतंय का हे स्टॅलिन यांना जाणून घ्यायचं आहे.

स्टॅलिन म्हणाले, हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकावर प्रचंड टीका झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन राज्यात फक्त मराठी भाषाच अनिवार्य आहे असे म्हटले होते. गैर हिंदी भाषक राज्यांवर हिंदी लादण्यावर झालेल्या टीकेवरून त्यांची भीती या वक्तव्यातून दिसून येते, असे एमके स्टॅलिन (MK Stalin) म्हणाले.

ब्रेकिंग : आता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य; भाषा वादात फडणवीस सरकारने जारी केला मोठा आदेश

स्टॅलिन यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्रात मराठीशिवाय अन्य कोणतीही भाषा तिसऱ्या भाषेच्या रुपात अनिवार्य राहिलेली नाही या महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान स्टॅलिन यांनी दिले आहे. जर असे असेल तर राष्ट्रीय शिक्षण धोरणात तिसऱ्या भाषेच्या अनिवार्य शिक्षणाची काहीच गरज नाही असे निर्देश केंद्र सरकार देणार का असा सवाल स्टॅलिन यांनी विचारला आहे.

वादावर काय म्हणाले फडणवीस

याआधी 20 एप्रिल रोजी राज्य सरकारच्या भाषा परामर्श समितीने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हि्ंदी बंधनकारक करण्याचा निर्णय रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. यानंतर फडणवीस म्हणाले होते की मराठी भाषा बंधनकारक राहणार आहे. महाराष्ट्रातील शाळांत हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्षांनी प्रचंड टीका केली होती.

Video : राहुल गांधींच्या जखमेवर फडणवीसांचा वर्मी घाव म्हणाले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय 

दरम्यान, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्यात (Hindi Language) येणार आहे. जून 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषकात तणावाचे वातावरण आहे. यातच आता शाळांत हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube