Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज होणार रियुनियन

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज होणार रियुनियन

Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस मराठी’चं घर आज पुन्हा एकदा त्याच 16 सदस्यांनी सजणार आहे. (Bigg Boss Marathi Season 5) या घरात आज रियुनियन (Reunion) असल्याने घराबाहेर गेलेले सर्व सदस्य आज आतमध्ये असलेल्या सदस्यांना भेटायला, (Bigg Boss Marathi ) त्यांना आणखी चांगलं खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायला येणार आहेत. त्यामुळे आजचा भाग वेगळा असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत, (Bigg Boss Marathi New Promo) “बिग बॉसच्या घरात होणार रियुनियन…त्यानंतर सर्वच सदस्य एकमेकांची भेट घेताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जाणारा आहे. अनेक दिवसांनी निक्कीला भेटण्यासाठी अरबाज मात्र प्रचंड आतुर झालेला पाहायला मिळत आहे.

अरबाज निक्कीला म्हणतोय,”तुझं बाहेर लफडं असेल म्हणून तू माझ्यापासून सुटलाय असं मला वाटत होतं”. निक्की आणि अरबाज या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरात त्यांना पुन्हा एकत्र पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत.

Bigg Boss Marathi Grand Finale : कोण ठरणार ‘या’ पर्वाचा महाविजेता ?

‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी रिव्हील

नेहमीप्रमाणे या पर्वाच्या ट्रॉफीनेदेखील ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”स्वागत करुया अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांचं”. पुढे अमेय आणि अमृता ‘बिग बॉस मराठी’ची या पर्वातील ट्रॉफी रिव्हील करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील ट्रॉफीने सर्वांचंचं लक्ष वेधून घेतलं आहे. डोळे दिपवणारी अशी ही ट्रॉफी आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या मानाच्या ट्रॉफीवर सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता प्रभू-वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर, यांच्यापैकी एकजण मानाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube