ब्रेकिंग : आता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य; भाषा वादात फडणवीस सरकारने जारी केला मोठा आदेश

ब्रेकिंग : आता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य; भाषा वादात फडणवीस सरकारने जारी केला मोठा आदेश

New Education Policy Maharashtra : राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकणे आता बंधनकारक होणार आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्यात (Hindi Language) येणार आहे. जून 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषकात तणावाचे वातावरण आहे. यातच आता शाळांत हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सीबीएसई अभ्यासक्रमावर (CBSE) आधारीत नव्या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यानंतर पुढील शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवे शिक्षण धोरण लागू करण्यात येईल. तसेच 2028-29 पर्यंत राज्यात बारावीपर्यंत सर्व इयत्तांसाठी शिक्षण धोरण लागू करण्यात येईल अशी माहिती आहे.

Jitendra Awhad : राज्य सरकारने मराठी माणसाच्या डोक्यावर हिंदी भाषा बसवली

या धोरणानुसार आता राज्यातील शाळांत तीन भाषा शिकणे सक्तीचे राहणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यात काही शाळांमध्ये तिन्ही भाषा सक्तीने शिकवण्यात येतात. इंग्रजी आणि मराठीसोबत आता हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता राज्यात 5+3+3+4 अंतर्गत अभ्यासक्रम राहणार आहे. शाळांतील अभ्यासक्रमाची चार टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या पाच वर्षांत पायाभूत पातळी राहील. त्यानंतर तिसरी ते पाचवीपर्यंत पूर्वतयारी पातळी राहील. 11 ते 14 या वयापर्यंत पूर्व माध्यमिक पातळी, पुढे 14 ते 18 वयापर्यंत (नववी ते बारावी) असा शैक्षणिक आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, नवीन अभ्यासक्रमानुसार आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके NCERT च्या अभ्यासक्रमावर आधारीत असतील. सामाजिक विज्ञान आणि भाषा यांसारख्या विषयांत स्थानिक संदर्भांचा समावेश असेल. इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके बालभारतीच तयार करणार आहे. या धोरणानुसार साक्षरता, अनुभवाधिष्ठीत शिक्षण, मूल्याधारीत अभ्यासक्रम, समग्र मूल्यांकन, शिक्षक प्रशिक्षण यांवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. राज्य सरकारमधील शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेतील समितीने या अभ्यासक्रम आराखड्यास मान्यता दिली आहे.

NCERT बोर्डचा अभ्यासक्रम होणार नवीन शैक्षणिक धोरणानुसार; केंद्रीय शिक्षण खात्याची माहिती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube