Jitendra Awhad : राज्य सरकारने मराठी माणसाच्या डोक्यावर हिंदी भाषा बसवली

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (97)

महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहामध्ये आज राज्यपाल रमेश बैस ( Ramesh Bais ) यांचे अभिभाषण झाले. तसेच आज मराठी भाषा गौरव दिन देखील आहे.  परंतु राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad )यांनी आक्षेप घेतला आहे. आज मराठी भाषा गौरव दिन असून देखील राज्यपाल बैस यांनी हिंदीमध्ये भाषण केले, असे आव्हाड म्हणाले आहेत.

दुर्गा भागवत यांनी एका संशोधनात सांगितले आहे की, मराठी भाषा ही संस्कृत भाषेचाही अगोदर पासून होती. एकीकडे दक्षिणेतील आठ भाषा या अभिजात भाषेचा दर्जा घेऊन बसल्या आहेत आणि मराठी भाषा आजही दिल्लीच्या तख्ताकडे डोके घासते आहे की, आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. तसेच उत्तर भारतातली हिंदी भाषा ही मराठी माणसाच्या डोक्यावर बसवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास भाषेचा प्रचार होता. त्यामुळे 450 विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकवली जाईल. राज्यपालांनी हिंदीत भाषण करुन महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या भाषणाला कशी परवानगी दिली. आत्तायपर्यंतच्या सर्व राज्यापालांनी मराठीत भाषण केलेले आहे. ही सर्व चूक राज्य सरकारची आहे, अशा शब्दात त्यांनी सरकावर निशाणा साधला आहे.

(आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही सोडेना…)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube