भाजपसोबत युती सर्वात मोठी चूक! अखेर महादेव जानकरांच्या मनातली खदखद आली समोर

Mahadev Jankar Statement On BJP Alliance : भाजपसोबत (BJP) युती करणे, ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. अकोल्यात पक्ष बैठकीसाठी आले (Maharashtra Politics) असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना सांगितले की, भाजप काँग्रेससारख्या इतर पक्षांतील बदनाम आणि भ्रष्ट नेत्यांना दबावाखाली पक्षात घेतलं जातं. त्यांच्याच जोरावर पक्ष वाढवायचा प्रयत्न होतो. त्यांनी भाजपची धोरणे पूर्णपणे संधीसाधू असल्याचे सांगत, अशा पक्षाला आता थांबवणे गरजेचे असल्याचा इशाराही दिला.
“हायवेवर अचानक ब्रेक लावणे हा निष्काळजीपणाच, इमर्जन्सीतही..”, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
भाजपला पराभूत करण्यासाठी
जानकर यांनी म्हटलंय की, भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही कुणाशीही युती करायला तयार आहोत. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी कुणाशीही आम्ही आघाडी करू, फक्त भाजपला रोखण्यासाठी. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना जानकर यांनी स्पष्ट केलं की, जिथे आघाडी होईल तिथे आघाडीत, नाहीतर स्वबळावर रासप निवडणूक लढवेल.
भारतावर 25 टक्के टेरिफ लावण्याचा अमेरिकेचा निर्णय; भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर
2029 लोकसभा निवडणुकीचीही तयारी
याच संवादात जानकर यांनी 2029 लोकसभा निवडणुकीचीही तयारी जाहीर केली. आता आम्ही केवळ केंद्राच्या राजकारणात राहणार आहोत. 2029 ला लोकसभा लढणार असून, यापुढे केंद्रातच मंत्री होणार, हा माझा विश्वास आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष आणि रविकांत तुपकर यांच्यासोबत समन्वय साधून मोठा पर्याय उभा करायचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील प्रामाणिक, शेतकरीहिताचे आणि परिवर्तनवादी नेतृत्व एकत्र आणायचं हेच आमचं ध्येय आहे.
भाजपसोबत युती करणे ही माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आता आम्ही कुणाशीही युती करू, पण भाजपला पराभूत करणारच. 2029 मध्ये लोकसभेची निवडणूक लढणार असून, केंद्र सरकारमध्ये मंत्री होणं हेच आमचं पुढचं लक्ष्य आहे, असं स्पष्ट शब्दांत महादेव जानकर यांनी सांगितलं आहे.