Mahadev Jankar : रासप नेत्याने घेतली राहुल गांधींची भेट.., जानकरांच्या डोक्यात नक्की काय?

Mahadev Jankar : रासप नेत्याने घेतली राहुल गांधींची भेट.., जानकरांच्या डोक्यात नक्की काय?

Mahadev Jankar Met Rahul Gandhi : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) मागील काही वर्षांत मोठी अस्थिरता निर्माण झाली. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानक (Mahadev Jankar) यांनी आज दिल्लीमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेतली. त्यामुळं राज्यातील राजकारणात चर्चांना उधान आलं. दरम्यान, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीमहोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी जानकर यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याची माहिती आहे.

यंदा जानकरांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती समारंभाचे आयोजन केलं. या सोहळ्यासाठी जानकर यांनी विविध मान्यवरांना निमंत्रण दिलं. आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. ही भेट केवळ कार्यक्रमाचे निमंत्रण देणं एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. तर भेटीत अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना मिळणार मोफत पोलिस बंदोबस्त, सरकारचा मोठा निर्णय 

दरम्यान, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, जानकरांनी महाविकास आघाडीत येण्याचे संकेत दिले होते. पण ऐनवेळी ते महायुतीत गेले होते. आणि त्यांनी परभणीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीपासून अंतर राखलं होतं. आता त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यानं ते पुन्हा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोलल्या जातं.

जानकरांच्या डोक्यात काय?
१. रासप हा प्रादेशिक पक्ष आहे. रासपला आपली राजकीय ताकद वाढवायची आहे. त्यासाठी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची जानकर मैत्री करू इच्छितात.

२. महायुतीने त्यांना पुरेसे महत्त्व न दिल्याने ते आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीशी जवळीक साधू पाहत आहेत. याशिवाय, अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीमहोत्सवाच्या निमित्ताने जानकर धनगर समाजातील आपले नेतृत्व अधिक मजबूत करू इच्छितात. राहुल गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्याची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभल्यास जानकरांना राष्ट्रीय पातळीवर महत्व प्राप्त होऊ शकतं.

३. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) दर्जाचे आरक्षण मिळावे, यासाठी जानकर प्रयत्नशील आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याने ते हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उपस्थित करू शकतात. आणि केंद्र सरकारवर दबाव निर्माण करतील.

जानकर कॉंग्रेससोबत जाणार?
१. कॉंग्रेस नेतृत्वाखालील महाविकास आघाडीमध्ये जानकर जाऊ शकतात. कारण, काँग्रेस आणि रासप यांच्यात सामाजिक न्याय, ग्रामीण विकास आणि शेतकरी-कामगार या बऱ्याच मुद्द्यांवर एकमत होऊ शकते.

२. महाराष्ट्रात कॉग्रेसची म्हणावी तशी ताकद नाही. अनेक मातब्बर नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांच्या मित्रपक्षांविरोधात विरोधी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट) मजबूत करण्यासाठी रासपसारख्या पक्षांची गरज आहे. त्यामुळं जानकरांना मविआत स्थान मिळू शकतं.

दरम्यान, आगामी काळात जानकर खरंच कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या बाजूनं झुकणार की, भाजपप्रणित एनडीएसोबत राहणे पसंत करतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube