मी सांगितलं तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता; विधान परिषद निवडणुकीवर पवारांचा खुलासा

मी सांगितलं तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता; विधान परिषद निवडणुकीवर पवारांचा खुलासा

Sharad Pawar Press Conference : लोकसभेला सहकाऱ्यांना जागा देण्याची परिस्थिती नव्हती. संधी भेटली तर डाव्यांना संधी देण्याचा विचार होता असा खुलासा शरद पवारांनी केला आहे. (Sharad Pawar) तसंच, त्यांनी यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. १२ मत शेकापला देण्याचा शब्द दिला होता. त्यामध्ये ५० टक्के शेकापला ५० टक्के ठाकरेंना असं ठरलं होतं. (MLC) दरम्यान, एक नंबरची मत काँग्रेसला द्या असंही आपण सांगितलं होत असंही पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अगोदर बोलावलं नाही पिंपरी- चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात 24 जणांचा प्रवेश 

सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिलं हे मला माहिती नाही. मात्र, आज राज्यात शांततेची गरज आहे याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. ती शांतता निर्माण व्हायलाचं पाहिजे या मताचा मी आहे. तसंच, जरांगे यांच्यासोबत जर सरकारने संवाद साधला असेल तर त्यामध्ये विरोधकांचं काय काम असा प्रतिप्रश्न उपस्थित करत पवारांनी सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीवरून केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं आहे. तसंच, अगोदर विरोधकांना बाजूला ठेवलं आणि आता विचारतायेत असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

पत्रकारितेवर भाष्य मोठी बातमी! सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या ४० मतदान केंद्रांवर मॉकपोल निवडणूक आयोगाचे आदेश

यावेळी पवारांनी पत्रकारितेवरही भाष्य केलं. आताच्या पत्रकारीतेत स्पर्धा आहे. मात्र दर्जाही सुधारलेला आहे. आपण विद्यार्थीदशेत बातमीदारी केली आहे अशी आठवणही शरद पवारांनी सांगितली. दरम्यान, दोन मित्रांना सोबत घेऊन नेता नावाचं वर्तमानपत्र काढल होतं अशी आठवणही पवारांनी यावेळी सांगितली. दरम्यान, आपण कोणती वर्तमानपत्र वाचता यावर आपण इंग्लिशसह मराठी वर्तमान पत्रही वाचतो असंही ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube