दोन दिवसांत आणखी एक मोठा खुलासा करणार; दिशा सालियन प्रकरणी वकील ओझांचा इशारा

Another big revelation in two days; Lawyer Ojha warns in Disha Salian case : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आणखी तीन अभिनेत्यांचे नाव घेत चौकशीची मागणी केली आहे. त्यावर आज वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी या प्रकरणामध्ये दोन दिवसात आणखी एक मोठा आम्ही खुलासा करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले वकील निलेश ओझा?
पत्रकार परिषदेत बोलताना ओझा म्हणाले की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल करायला दिली आहे. लवकरच याचिका दाखल होईल. या आधी जी pil दाखल केली त्याला ही टॅग करता येईल. 12 जानेवारी 2024 रोजी लेखी तक्रार राशीद पठाण यांनी दिला आहे. तसेच बलात्कार, ndps आणि बाकीचे पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे जेव्हा दाखल पात्र गुन्हा येतो तेव्हा पाहिले गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि तक्रार दाखल झाली पाहिजे. जर बलात्कारचा गुन्हा नोंद केला नाही तर यात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होते. त्यामुळे यात पोलीस अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला नाही. त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची भिती संपली ! भारतीय शेअर बाजारात चौथ्या दिवशी मोठी तेजी
तसेच या प्रकरणात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, पांचोली, पोलीस अधिकारी यांची चौकशी करा. त्यांची नार्को टेस्ट आणि फेर तपासणी करावी. दिशाच्या कुटुंबाला संरक्षण देऊन तपास महाराष्ट्र बाहेर आणि चांगल्या अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण देण्यात यावं.समीर वानखेडे देखील सुशांतच्या प्रकरणात होते.त्यांना सुशांत राजपूत, दिशा सालियन आणि रिया चक्रवर्ती यांचे फोन कॉल आढळले आहेत.तसेच आदित्य ठाकरे आणि पांचोली यांचे टॉवर लोकेशन आणि मोबाईल लोकेशन हे सेम आहेत. नार्कोटिक्समध्ये हे सगळे पुरावे बाहेर येतील. यात समीर वानखेडे यांना आफिडेवीटवर देण्यात यावे.ते सगळे त्यांनी दाखवावे.
धक्कादायक! पोट दुखू लागल्याने स्वतःच केलं ऑपरेशन; YouTube पाहून घातले 11 टाके अन् पुढे…
पुढे ओझा म्हणाले की, जर या प्रकरणात आम्हाला काही झालं तर आदित्य ठाकरे आणि टीमला जबाबदार ठरवावं. कारण आदित्य ठाकरेंनी सांगितलं की, दिशाच्या प्रकारणात आम्हला क्लीन चिट दिली आहे.दिशाचा मृत्यू आत्महत्या दाखवली आहे.तसेच सकाळपासून काही लोक बोलत आहेत की, या आरोपांमध्ये तथ्य नाही तर राजकीय दबाव प्रेरित आहे. पण हे कोर्टात चालत नाही आणि असे बोलून तपास थांबत नाही..
या प्रकरणी परंबीर सिंग यांना देखील प्रश्न विचारावे. 14 व्या मजल्यावरून जर एखादी व्यक्ती पडतेय तर ती इतक्या लांब कशी पडते. त्यामुळे 25 फूट वरून बॉडी पाडण्याचे री क्रियेशन करण्यात यावे. यात मालवणी पोलिसांनी खोटा रिपोर्ट तयार केला. दिशाच्या वडिलांना जे पार्थिव दिला ते सुद्धा क्लिअर होता. नितेश राने आणि नारायण राणे यांनी आरोप केल्यावर प्रकरणावर चर्चा झाली. तर मुंबई महापौर त्या ठिकाणी गेल्या होत्या. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात हे सर्व सेटल केलं.पण एकनाथ शिंदेंची सत्ता आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं.
“अनिल परब, ठाकरेंना विचारा राठोडांना का क्लीनचीट दिली?” चित्रा वाघ संतापल्या, सभागृहात काय घडलं?
तसेच यावेळी ओझा यांनी एक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, दोन दिवसात आणखी एक मोठा आम्ही खुलासा करणार.दिशा सालियानच्या फ्लॅट वर आदित्य ठाकरे आणि पांचोली होते. त्याची टॉवर लोकेशन आम्ही दिले आहेत. चौकशी साठी बनवण्यात आलेल्या sit वर आम्हाला भरोसा नाही.
कारण यात अजून वरिष्ठ दर्जाचे अधिकारी द्यावे अशी आम्ही मागणी करतोय. असं ओझा म्हणाले.