विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

CBSE pattern implemented in Government schools of state; Education Ministers announcement : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण आता राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. याबाबतची मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिवेशना दरम्यान सभागृहात केली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे.
“अनिल परब, ठाकरेंना विचारा राठोडांना का क्लीनचीट दिली?” चित्रा वाघ संतापल्या, सभागृहात काय घडलं?
दरम्यान गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यात यावा यासाठी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आज अखेर ही मागणी पुर्ण झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या विषयावर मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीमध्ये याचा आढावा घेण्यात आला होता. असंही भुसे म्हणाले.
‘चंदू चॅम्पियन’ मधील भूमिकेचं कौतुक! कार्तिक आर्यनचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान
राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यामागे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी असा उद्देश आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुकाणू समिती काम पाहत होती. त्यांनी या निर्णयाला मन्यता दिल्यानंतर याबाबतची मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिवेशना दरम्यान सभागृहात केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये शिक्षण विभागाचाही समावेश होता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शंभर दिवसांच्या आराखड्याचं सादरीकरण केलं होतं. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यानुसार आवश्यक बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या होत्या. बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली होत्या. त्यानंतर आता अखेर याची अधिकृत घोषणा झाली आहे.