दिशा सालियन प्रकरण : चहुबाजूंनी घेरलेल्या आदित्य ठाकरेंसाठी महायुतीचे तीन नेते मैदानात?; प्रतिक्रियांमुळे भुवया उंचावल्या

दिशा सालियन प्रकरण : चहुबाजूंनी घेरलेल्या आदित्य ठाकरेंसाठी महायुतीचे तीन नेते मैदानात?; प्रतिक्रियांमुळे भुवया उंचावल्या

BJP aggressive in Disha Salian case, Shinde’s MLA backs Thackeray : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील आरोप केले आहे. त्यामुळे या प्रकरणी भाजप आक्रमक झाले. मात्र दुसरीकडे महायुतीच्याच तीन नेत्यांनी ठाकरेंची पाठराखण केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, अजित पवारांचे अमोल मिटकरी आणि भाजप नेते सुधील मुनगंटीवार यांचा समावेश आहे.

केज तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आधार, उचलणार दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च

यावर प्रश्न विचारला असता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. कारण जेव्हा तीन वर्ष आमचं सरकार होतं. तेव्हा या दिशा सालियान प्रकरणामध्ये तपासा दरम्यान काहीही सापडले नाही. मी या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं समर्थन करत नाही. जे तपासात पुढे आले आहे. तेच बोलत आहे. तसेच जेव्हा सीआयडीने या प्रकऱणाचा तपास केला तेव्हा यामध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. तसेच त्याच वेळी ज्या कुणाकडे पुरावे होते त्यांनी ते तेव्हाच द्यायल हवे होते. कारण कुणाकडे कहीही पुरावे नाही म्हणूनच आदित्य ठाकरे यांना क्लिन चिट देण्यात आली होती.

युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला मंजुरी, वांद्रे कुटुंब न्यायालयाचा मोठा निर्णय

त्याचबरोबर अजित पवारांच्या आमदाराने देखील ठाकरेंची पाठराखण केली आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणी आता इतक्या उशीरा का याचिका दाखल करण्यात आली आहे? यामागे नागपुरात झालेली दंगल प्रकरण झाकण्याचा प्रयत्न आहे का? त्यामुळे सत्ताधारी असो वा विरोधक कुणीही या प्रकरणाला पाठबळ देऊ नये. राज्यात इतरही महत्त्वाचे प्रश्न आहेत. तसेच महाराजांविषयी अपमानजनक बोलणाऱ्या कोरटकरवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. असं अमोल मिटकरी म्हणाले

Girija Prabhu : गिरीजा प्रभूचं मनमोहक अंदाजात फोटोशूट

तसेच भाजप नेते सुधील मुनगंटीवार म्हणाले की, सालियन कुटुंबावर त्यावेळी खरचं दबाव होता का? याचा काही पुरावा आहे का? काहीही प्रचार केल्याने एखाद्याचं आयुष्य उदध्वस्त होऊ शकत. असं म्हणत मुनगंटीवारांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

या प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आणखी तीन अभिनेत्यांचे नाव घेत चौकशीची मागणी केली आहे.तर आता या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मोठी बातमी! ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; CM फडणवीसांची घोषणा

गेल्या पाच वर्षात बदनामी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. आम्ही न्यायालयात उत्तर देऊ . असं माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 5 वर्षांपासून बदनामीतचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच या प्रकरणात कोर्टात बोलावलं कोर्टात बोलू, होईल ते होईल असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube