युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला मंजुरी, वांद्रे कुटुंब न्यायालयाचा मोठा निर्णय

युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला मंजुरी, वांद्रे कुटुंब न्यायालयाचा मोठा निर्णय

Yuzvendra Chahal and Dhanashree Divorce : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असून वांद्रे कुटुंब न्यायालयाने युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.

माहितीनुसार चहलने 5 फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देणार आहे.

वांद्रे कुटुंब न्यायालयाला आज या प्रकरणात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.  गेल्या अनेक दिवसांपासून चहल आणि धनश्री एकमेकांसोबत राहत नसून त्यांच्या घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू होता.  मुंबई उच्च न्यायालयात धनश्री वर्माने सहा महिन्यांच्या कूलिंग ऑफ कालावधीत सूट देण्याची मागणी केली होती. ही याचिका उच्च न्यायालायाने स्वीकारून वांद्रे कुटुंब न्यायालयाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube