चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची ‘डेट फिक्स’; 60 कोटींच्या चर्चेत पोटगीचा खरा आकडा समोर

चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची ‘डेट फिक्स’; 60 कोटींच्या चर्चेत पोटगीचा खरा आकडा समोर

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, उद्या चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) वांद्रे कुटुंब न्यायालयाला दिले आहेत.

तर दुसरीकडे चहल धनश्रीला पोटगी म्हणून 60 कोटी रुपये देणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र आता चहल धनश्रीला 60 कोटी रुपयांची पोटगी देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, चहल धनश्री वर्माला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देणार आहे. 4.75 पैकी चहलने धनश्रीला 2.37 कोटी रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चहल आणि धनश्री एकमेकांसोबत राहत नसून त्यांच्या घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने धनश्री वर्माची याचिका स्वीकारली आहे. धनश्रीने उच्च न्यायालयात सहा महिन्यांच्या कूलिंग ऑफ कालावधीत सूट देण्याची मागणी केली होती. ही याचिका उच्च न्यायालायाने स्वीकारली असून वांद्रे कुटुंब न्यायालयाला उद्या चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जामदार (Madhav Jamdar) यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चहलचा सहभाग लक्षात घेत वांद्रे कुटुंब न्यायालयाला उद्यापर्यंत घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय देण्याचा आदेश दिला आहे. वांद्रे कुटुंब न्यायालयाने या प्रकरणात हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 ब अंतर्गत घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी प्रदान केला होता मात्र घटस्फोटाचा निर्णय लवकरात लवकर घेता यावा म्हणून धनश्री वर्मा यांनी उच्च न्यायालयात हा कालावधी माफ करण्याची याचिका दाखल केली होती. धनश्री वर्मा याची याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली असून उद्या चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

धनश्री आणि चहल गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत असल्याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली होती. या माहितीवरुन उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयाला आदेश दिला आहे.

फहीम खाननं लिहिली नागपूर हिंसाचाराची स्क्रिप्ट; राड्याच्या FIR मध्ये नेमकं काय काय?

नुकतंच चहल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप लीग सामन्यात झालेल्या भारत – पाकिस्तान सामन्यात प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आरजे महवशसोबत दिसला होता त्यानंतर देखील दोघांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube