IND vs ENG : अर्शदीप सिंगने रचला इतिहास, मोडला युजवेंद्र चहलचा ‘हा’ मोठा विक्रम

  • Written By: Published:
IND vs ENG : अर्शदीप सिंगने रचला इतिहास, मोडला युजवेंद्र चहलचा ‘हा’ मोठा विक्रम

IND vs ENG :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs ENG) पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) विक्रम मोडून इतिहास रचला आहे.

अर्शदीप सिंग भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात सलामीवीर फिल साल्टला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला तर दुसऱ्या षटकात बेन डकेटला बाद करत इतिहास रचला आणि टी-20 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला.

टी-20 मध्ये भारतासाठी 80 सामन्यात युजवेंद्र चहलने 96 विकेट घेतले आहे तर अर्शदीप 97 विकेट्ससह टी-20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. अर्शदीप सिंगने फक्त 61 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर  टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्याच्या यादीत भुवनेश्वर कुमार तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 87 सामन्यांमध्ये 90 विकेट घेतले आहेत. तर जसप्रीत बुमराह 89 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.

IND vs ENG Live: भारताच्या प्लेइंग 11 मधून शमीचा ‘पत्ता कट’, कर्णधार सूर्या नेमकं काय म्हणाला?

तर दुसरीकडे पहिल्या टी-20 सामन्यात  इंग्लंडने भारताला 133 धावांचे लक्ष्य दिले आहे.  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाने दमदार सुरुवात करत पहिल्या तीन षटकात दोन विकेट घेतले त्यानंतर जोस बटलरने शानदार फलंदाजी करत 44 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावांची खेळी केली. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 23 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याने दोन -दोन विकेट घेतले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube