IND vs ENG Live: भारताच्या प्लेइंग 11 मधून शमीचा ‘पत्ता कट’, कर्णधार सूर्या नेमकं काय म्हणाला?
IND vs ENG Live: आजपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना कोलकत्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) सुरू झाला असून भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भारताने या सामन्यासाठी 14 महिन्यांनंतर भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammed Shami) प्लेइंग-11 मध्ये स्थान दिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने फक्त एक स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. तर ऑलराउंडर म्हणून हार्दिक पंड्या आणि नितीश रेड्डीला स्थान देण्यात आले आहे. टॉस जिंकल्यानंतर सूर्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी सूर्य कुमार यादव म्हणाला की, आम्ही येथे दोन दिवस रात्री सराव केला असून रात्रीच्या वेळी दव पडण्याची जास्त शक्यता आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा होणार आहे. संघ निवडणे ही एक डोकेदुखी होती, आम्ही आमच्या ताकदीच्या आधारे संघ निवडला आहे. या सामन्यात मोहम्मद शमी, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा खेळताना दिसणार नाही. असं तो म्हणाला. मात्र या खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये संधी का मिळाली नाही याबद्दल सूर्याने अधिक माहिती दिलेली नाही.
A look at our Playing XI 🔽
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NHhYbQmNgf
— BCCI (@BCCI) January 22, 2025
पहिल्या टी20 साठी इंडिया प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, दोन अवलिया कलाकार येणार एकत्र
पहिल्या टी20 साठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.