Mohammed Shami च्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस; बॅडमिंटनच्या दोन खेळाडूंना खेलरत्न

Mohammed Shami च्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस; बॅडमिंटनच्या दोन खेळाडूंना खेलरत्न

Mohammed Shami : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने यावेळीचा विश्वचषकT20 विश्वचषकासाठी नामिबिया टीम पात्र, एका जागेसाठी ‘या’ तीन संघात चुरस प्रचंड गाजवला. त्यानंतर आता शमीच्या नावाची शिफारस थेट अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने शमीच्या नावाची ही शिफारस क्रिडा मंत्रालयाकडे केली आहे.

Manoj Jarange : ‘भुजबळांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही म्हणून त्यांचं नाटक’; जरांगेंचा हल्लाबोल

या अगोदर त्याचं नाव या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेलं नव्हतं. शमीने विश्वचषकामध्ये सर्वाधिक बळी घेतले. त्याने फक्त सात सामने खेळले त्यामध्ये त्याने घेतलेल्या बळींची संख्य 24 होती. त्याच्या कामगिरीमुळे या विश्वचषकामध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत पोहण्याची मोठी मजल मारली.

मलायकासोबत लग्न कधी करणार? करण जोहरच्या कार्यक्रमात अर्जुन कपूरने थेटच सांगितलं

दरम्यान पहिल्या चार सामन्यामध्ये तर तो बाहेरच होता. क्रिडा रसिकांकडून त्याला खेळण्यासाठी घेण्याचा प्रचंड आग्रह देखील केला जात होता. पण हार्दिक पांड्या दुखापग्रस्त झाला. त्यामुळे शमीला मैदानावर उतरण्याची संधी मिळाली. याच संधीच शमीने सोनं केलं. तर आता बीसीसीआयने त्याची थेट अर्जुन पुरस्कारासाठी क्रिडा मंत्रालयाकडे केली आहे.

‘जर्मन शिका, 4 लाख नोकऱ्या वाट बघतायत’ : अजितदादांचा बेरोजगारांना परदेशात जाण्याचा सल्ला

त्याचबरोबर बॅडमिंटनचे दोन खेळाडूंना खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. बॅडमिंटनच्या पुरूष दुहेरीचा जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे.

क्रिडा मंत्रालयाने यावर्षीच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कारासाठी 12 सदस्यांची समिती स्थाप केली आहे. यामध्ये उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश एएम खानविलकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर हॉकी खेळाडू धनराज पिल्ले, माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता, माजी बॉक्सर अखिल कुमार, शुमा शिरूर, अंजुम चोप्रा, तृप्ती मुर्गुंडे आणि पाशा या खेळाडूंचा देखी समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube