T20 विश्वचषकासाठी नामिबिया टीम पात्र, एका जागेसाठी ‘या’ तीन संघात चुरस
T20 World Cup : 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) नामिबियाचा (Namibia) संघ पात्र ठरला आहे. आफ्रिका क्वालिफायरमधून पात्र ठरणारा नामिबिया (Namibia Qualify) हा पहिला संघ ठरला. नामिबियाच्या संघाने 5 पैकी 5 सामने जिंकून T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. नामिबियाच्या पात्रतेसह T20 विश्वचषकासाठी एकूण 19 संघ निश्चित झाले आहेत आणि फक्त एका संघाची प्रतिक्षा आहे. उर्वरित एक स्थान झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा यापैकी एकाकडे जाण्याची अपेक्षा आहे.
रिचर्ड इरास्मसच्या नेतृत्वाखाली नामिबियाने पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात टांझानियाचा 58 धावांनी पराभव करून T20 विश्वचषक 2024 मध्ये प्रवेश केला. संपूर्ण क्वालिफायरमध्ये नामिबिया चांगलाच फॉर्ममध्ये दिसत होता. नामिबियाने एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला आपल्या पुढे टीकू दिले नाही.
T20 World Cup 2024: तारीख ठरली, प्रथमच अमेरिकेत होणार स्पर्धा, 20 संघाचा असेल समावेश
टांझानियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हारल्यानंतर नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 157 धावा केल्या. नामिबियासाठी जेजे स्मितने 160 च्या स्ट्राइक रेटने 25 चेंडूंमध्ये 40 धावांची खेळी खेळली, यामध्ये 1 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाच्या गोलंदाजांसमोर टांझानियन संघाला 20 षटकांत केवळ 99/6 धावाच करता आल्या. अशा प्रकारे नामिबियाने 58 धावांनी विजय मिळवला.
T20 विश्वचषकासाठी 19 संघ पात्र ठरले
वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया.