T20 World Cup 2024: तारीख ठरली, प्रथमच अमेरिकेत होणार स्पर्धा, 20 संघाचा असेल समावेश

  • Written By: Published:
T20 World Cup 2024: तारीख ठरली, प्रथमच अमेरिकेत होणार स्पर्धा, 20 संघाचा असेल समावेश

T20 World Cup : 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या तारखांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 ते 30 जून दरम्यान होणार आहे. यादरम्यान 27 दिवसांत एकूण 55 सामने होतील. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच या स्पर्धेत 20 संघ खेळताना दिसणार आहेत. क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आयसीसी आपल्या कोणत्याही जागतिक स्पर्धेचे आयोजन अमेरिकेत करणार आहे. (t20 world cup 2024 dates finalized 4 to 30 june west indies usa to host 10 city and 55 matches)

अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या एकूण 10 शहरांमध्ये T20 विश्वचषकाचे सामने आयोजित केले जाईल. याबाबत सर्व ठिकाणे आणि सामन्यांच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जातील. फ्लोरिडा व्यतिरिक्त, अमेरिकेतील ज्या 4 शहरांमध्ये सामने होणार आहेत त्यात मॉरिसविले, डॅलस आणि न्यूयॉर्कचा समावेश आहे. फ्लोरिडामध्ये आतापर्यंत केवळ आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यात आले आहेत, इतर तीन शहरांच्या स्टेडियममध्ये एकही सामना झाला नाही.

T20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघ प्रथमच सहभागी होणार

ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये 20 संघ सहभागी होताना दिसतील, ज्यामध्ये 15 संघ आतापर्यंत मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. 2022 साली झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत टॉप-8 स्थानावर असलेले टॉप-8 संघ थेट मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय आयर्लंड आणि स्कॉटलंड व्यतिरिक्त पापुआ न्यू गिनीचा संघही मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

ब्रिजभूषण यांचा जावई होणार कुस्ती महासंघाचा अध्यक्ष, महाराष्ट्राचा प्रतिनिधीच नाही

20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील, त्यानंतर 40 गट सामने खेळवले जातील आणि सर्व गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करू शकतील. येथून 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेतेपदाचा सामना 30 जून रोजी होणार आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच 50 हून अधिक सामने खेळवले जाणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube