ब्रिजभूषण यांचा जावई होणार कुस्ती महासंघाचा अध्यक्ष, महाराष्ट्राचा प्रतिनिधीच नाही
WRESTLING ELECTIONS: महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने वादात सापडलेले भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी रविवारी (30 जुलै) एक बैठक बोलावली आहे. त्यांची ही बैठक भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. ब्रिजभूषण सिंह आणि त्यांचा मुलगा करण सिंह या निवडणुकीपासून लांब राहणार आहे पण त्यांचे पॅनल या निवडणुकीत असणार आहे.
भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांचे जावई विशाल सिंह हे बिहारचे (बिहार कुस्ती महासंघ) प्रतिनिधी आहेत. विशाल सिंह कदाचित भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदासाठी दावा करू शकतात. या निवडणुकीत अधिक सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी ठरले तर ते भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्षही होऊ शकतात.
कुस्ती महासंघाचे मावळते सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले केली की ब्रिजभूषण सिंह यांनी 30 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. मात्र त्यांनी बैठकीचे ठिकाण सांगितले नाही. ब्रिजभूषण सिंह यांना पाठिंबा देणारे सर्व (राज्य संस्थांचे अधिकारी) या बैठकीला उपस्थित राहतील. निवडणुकीच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी विविध राज्य संघटनांचे अध्यक्ष आणि सचिव या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Tamil Nadu : भाजपच्या ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेला सुरुवात; मंत्री शाह यांनी दाखवला हिरवा झेंडा
31 जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
WFI ची निवडणूक 12 ऑगस्टला होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे अनेक आरोप आहेत. ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत. खरे तर संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांना 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार हा कमाल कार्यकाळ आहे.
I.N.D.I.A. चे ‘हे’ नेते उद्या मणिपूरला जाऊन, देणार मदत शिबिरांना भेट
महाराष्ट्र आणि त्रिपुराचा एकही प्रतिनिधी नाही
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि त्रिपुराचे प्रतिनिधी नसतील. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन्ही गटांचे दावे फेटाळले आहेत, तर त्रिपुराची 2016 पासून मान्यता रद्द करण्यात आली आहे. प्रत्येक राज्य युनिटमधून दोन प्रतिनिधींना मतदान करण्याची परवानगी असेल. उमेदवारी अर्जांची छाननी 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी 7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणुका आवश्यक असल्यास 12 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.