Tamil Nadu : भाजपच्या ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेला सुरुवात; मंत्री शाह यांनी दाखवला हिरवा झेंडा
Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये भाजपच्या ‘एन मॅन एन मक्कल'(My Land My People) या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरम्यान, यावेळी मंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूच्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी तमिळ भाषा येत नसल्याने जनतेची दिलगिरी व्यक्त करीत हिंदीतून भाषण केलं आहे.
I.N.D.I.A. चे ‘हे’ नेते उद्या मणिपूरला जाऊन, देणार मदत शिबिरांना भेट
शाह म्हणाले, भारताची परंपरा, महान संस्कृती आणि धर्माचा साक्षीदार असलेल्या रामेश्वरमला मी नमन करीत आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून तामिळनाडूमधील घराणेशाही, भ्रष्टाचार, संपवून राज्यात एक विकासाचे नवे युग सुरु करायचं आहे. ही केवळ राजकीय यात्रा नसून हा प्रवास तमिळ भाषेला संपूर्ण जगापर्यंत नेण्याचा प्रवास असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
Ram Shinde : ‘मी लढणार, 2024 ला दाखवूनच देणार’; शिंदेंचा पवारांविरुद्धचा प्लॅन ठरला!
तसेच तमिळनाडू राज्यात असलेल्या घराणेशाहीला आमचा विरोधच, याच घराणेशाहीला मुक्त करण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढत आहोत. यासोबतच इथला भ्रष्टाचार आम्हाला नष्ट करायचा आहे. त्यासाठीच आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पदयात्रेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादाविषयी प्रसार करण्यात येणार असून तमिळ भाषा, संस्कृती, इतिहासांचं देशाच्या विकासात मोठं योगदान राहिल्याचं ते म्हणाले आहेत.