T20 World Cup 2024: आयर्लंडनंतर, आणखी एका संघाला T20 विश्वचषकाचे तिकीट, 15 संघ झाले निश्चित

  • Written By: Published:
T20 World Cup 2024: आयर्लंडनंतर, आणखी एका संघाला T20 विश्वचषकाचे तिकीट, 15 संघ झाले निश्चित

T20 World Cup 2024:  2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतील हा एकमेव संघ आहे आणि स्पर्धेसाठी पात्र ठरणारा 15 वा संघ ठरला आहे. पापुआ न्यू गिनीने शुक्रवारी फिलिपाइन्सचा 100 धावांनी पराभव करत ही कामगिरी केली. (papua new guinea qualifies for t20 world cup 2023)

पापुआ न्यू गिनीने प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावत 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात फिलिपाईन्सचा संघ 129 धावांवर बाद झाला. पापुआ न्यू गिनी पाच सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता त्याचा शनिवारी जपानविरुद्धचा सामना निव्वळ औपचारिकता राहिला आहे. वीस संघांच्या या स्पर्धेत पाच संघांची निवड होणे बाकी आहे. बर्म्युडा येथे होणाऱ्या यूएस पात्रता फेरीतून एक संघ, नेपाळ आणि नामिबिया येथे होणाऱ्या आशिया आणि आफ्रिका पात्रता फेरीतून प्रत्येकी दोन संघ निवडले जातील.

यापूर्वी गुरुवारी आयर्लंडने 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्रताही मिळवली होती. आयर्लंड आणि जर्मनी यांच्यात T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. मात्र पावसामुळे तो होऊ शकला नाही. एकही सामना न झाल्याचा फायदा आयर्लंडला झाला आणि संघ विश्वचषकात पोहोचला. इटली, डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि जर्सीविरुद्धचे शेवटचे चार सामने जिंकल्यानंतर आयर्लंडला फक्त एका गुणाची गरज होती. पावसामुळे सामना रद्द झाल्यास आयर्लंडला हा गुण मिळाला.

भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? इंस्टाग्रामवरील बदलामुळे वाढली चर्चा

आतापर्यंत या दोन संघांव्यतिरिक्त अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांना विश्वचषकाची तिकिटे मिळाली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube