Manoj Jarange : ‘भुजबळांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही म्हणून त्यांचं नाटक’; जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange : ‘भुजबळांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही म्हणून त्यांचं नाटक’; जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांचा (Chhagan Bhujbal) एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. भुजबळ एकदा तुरुंगात जाऊन आलेत त्यांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही यासाठीच ते आता माझ्या जीवाला धोका आहे, माझी छाती दुखत आहे, असे खोटे सांगून वेळ मारून नेत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. मंत्री छगन भुजबळ यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य नुकतंच केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलं असता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली. (Manoj Jarange Patil Criticized Chhagan Bhujbal Again)

जरांगे पाटील म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं याला जर ते झुंडशाही म्हणत असतील तर त्यांचे विचार किती प्रगल्भ आहेत हे लक्षात येतं. त्यांना कोण गोळी मारील, कोण कशाला स्वतःचे हात खराब करून घेईल. मी जातीयवादी आहे असं चित्र रंगवलं म्हणता तर मग जातीयवादी कोण आहे?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा म्हटलं तरी करत नाही. तिथंही जातीवाद. ओबीसी महामंडळ सगळ खाल्लं, तुमच्याच लोकांना खाऊ दिलं नाही. तिथं जातीवाद केला. घटनेच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळायला नको असं म्हणता तिथंही जातीवाद तुम्हीच करता. गावागावात आंदोलनं उभी करायला लावायची परत म्हणायचं मी द्वेषी नाही. तुम्हाला कशाला कोण गोळी मारील, इतक्या खालच्या दर्जाचे विचार मराठ्यांचे नाहीत, अशा शब्दांत टीका करत तुम्ही काहीच करण्याची गरज नाही आम्ही आरक्षण शंभर टक्के घेणारच असे जरांगे पाटील म्हणाले.

‘बीड जाळपोळ छगन भुजबळांनीच घडवून आणलायं’ मनोज जरांगेंचा गंभीर आरोप 

भुजबळ विश्वासघातकी माणूस, फडणवीस डाव ओळखा 

आमच्या दौऱ्याला पोलीस संरक्षण मिळत नव्हते. तीस तीस किलोमीटर पोलीस नसायचे. यांना (भुजबळ) स्वतःवरची केस मागं घ्यायची आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी हा डाव ओळखला पाहिजे हा विश्वासघातकी माणूस आहे. सरकार विरोधात सामान्य माणसाचा रोष वाढायला लागला आहे. फक्त एक क्लिप व्हायरल केली म्हणून मराठा तरुण अनेक महिन्यांपासून आतमध्ये आहेत. त्यांनी असं काय केलं. त्यांचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करू लागले हे माध्यमांतून घराघरात दिसत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube