‘बीड जाळपोळ छगन भुजबळांनीच घडवून आणलायं’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil : बीडचा जाळपोळ छगन भुजबळांनीच (Chagan Bhujbal) घडवून आणला, असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं आहे. मनोज जरांगे जाहीर सभेतून तर छगन भुजबळ अधिवेशनासह माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर देत आहेत. त्यावरच बोलताना जरांगे यांनी हा आरोप केला आहे.
‘ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलतोयं’; जरांगेंकडून भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख
मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ कोणावरही आरोप करतोयं, बधिर झालायं. कुऱ्हाडी कोयत्यांची भाषा करतो दोन समाजात तेढ निर्माण करणारा तोच आहे. मंत्रिपदाचा गैरवापर करणारा छगन भुजबळ आहे. महाराष्ट्राला लागलेला मोठा कलंक असून त्याच्याच पाहुण्याने बीडमधील हॉटेल जाळलं पण तो मराठ्यांच्या निष्पाप लोकांना बदनाम करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
आरक्षणाच्या तापलेल्या वातावरणात शिंदे सरकारनं खेळलं ओबीसी कार्ड; तब्बल 3377 कोटींची तरतूद
तसेच प्रकाश सोळंके बोलले की निष्पाप मराठ्यांना बदनाम करु नका. भुजबळाच्या पाहुण्याचं हॉटेल त्याच्याच पाहुण्याने जाळलं ते लोकं अद्याप अटक का नाहीत? तुला जर एवढं वाटतंय की अशांतता पसरली . आंतरवलीत लोकांना मारलं तेव्हा कुठं गेलता? तुला कोणी मोजतही नाही. तू मराठा विरोधी नाहीतर तुला आंतरवलीत यायला काय झालंत लोकांचे डोके फुटले होते तेव्हा? असा सवालही मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.
Smoke Bomb : संसदेवर ‘गॅस’अॅटॅक? सभागृहात धुरच धुर करणारा ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?
बीडची दंगल तूच घडवून आणली आहे, तुला नंबराचं कसकायं माहिती? कुठेही चेक करा असं नंबराचं काही नाही त्यामुळे छगन भुजबळांनीच दंगल घडवून आणली असून सरकारला विनंती आहे की, तुम्ही याचं ऐकून बळ देऊ नका जातीय दंगल भडकवीन तो. तो मराठा आरक्षणाचे बोर्ड जाळतो, फाडतो, हॉटेलही जाळायला लावतो. त्याचं ऐकून आमच्यावर केसेस करु नका मराठ्यांवर अन्याय करु नका, अशी विनंती मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, आंतरवलीतले गुन्हे मागे घ्या, अटक करणार नाही म्हटलं होतं. त्याचं ऐकून तुम्ही कारवाई करत आहात फडणवीससाहेब तुम्ही मराठ्यांचा वाटूळ करु नका, तुम्ही त्याचं ऐकतायं हे महाराष्ट्राला दिसतं असल्याचंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.