‘ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलतोयं’; जरांगेंकडून भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख
Manoj Jarange Patil : इतर ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलत असल्याचं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगेंकडून (Manoj Jarange)
छगन भुजबळांचा (Chagan Bhujba) पुन्हा एकेरी उल्लेख केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा-ओबीसी वाद चव्हाट्यावर येत आहे. ओबीसी नेते छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केल्याने मनोज जरांगेंकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधून जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
‘हे चुकीचंच, मनोरंजनाला फाशी द्या…’, संसदेत सुरक्षा भंग करणाऱ्या मनोरंजनच्या वडिलांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की त्याचे (छगन भुजबळ) ऐकून आमच्या समाजावर अन्याय करू नका. कारण आमच्या नोंदी अधिकृत शासकीय सापडलेले आहे, त्यामुळे अन्याय करू नये, अशी विनंतीच मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच बाकी कोणत्या ओबीसी नेत्यांना आम्ही नाव ठेवणार नाही, कारण त्यांचे आमचे गाव पातळी संबंध चांगले आहेत. हा एकच आहे जो बोलत आहे. यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे देखील नेते तिथे आले होते. त्यांचे ऐकून आम्ही मान ठेवला त्यांनी आता आमचाही मान ठेवावा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Parliament Security Breach : संसदेत धूर करून ‘तानाशाही नहीं चलेगी’ म्हणणारे चौघं कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले ते बरोबर आहे. कारण ते खोटे बोलत नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनीही खोटं बोलू नये. अंतरवली सराटीत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचे मंत्रीही आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सांगितलं होतं की, अंतरवली सराटीतील तुमच्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ. तसेच महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेऊ. त्यामुळे फडणवीस यांनी मागे फिरू नये. त्यांनी खरं बोलावं. त्या एकट्याचं ऐकूण (छगन भुजबळ) आमच्यावर अन्याय करू नाही. अन्यथा नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं थेट इशारा जरांगेंनी दिला.