Parliament Security Breach : संसदेत धूर करून ‘तानाशाही नहीं चलेगी’ म्हणणारे चौघं कोण?

Parliament Security Breach : संसदेत धूर करून ‘तानाशाही नहीं चलेगी’ म्हणणारे चौघं कोण?

Parliament Security Breach : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) एक मोठी घटना घडली. संसदेचं कामकाज सुरु असतानाच देशातील चार कोपऱ्यातून आलेल्या एकूण चार जणांनी खळबळ माजवली आहे. चार पैकी दोघांनी संसदेच्या गॅलरीतून सभागृहात उडी घेत स्मोक बॉम्बद्वारे पिवळा रंगाचा धूर फेकला आहे. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. तर इतर दोन जणांनी संसदेच्या बाहेर ‘तानाशाही नहीं चलेगी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, या चौंघानाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. भर ससंदेत असा प्रकार घडवून आणणारे हे चार जण नेमके आहेत तरी कोण? त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात…

Ram Shinde : ‘आमदार अन् मंत्री झालो, माझा नातू कारखानेच काढील’; राम शिंदेंचा रोहित पवारांना खोचक टोला

अमोल शिंदे :
संसदेच्या सभागृहात स्मोक बॉम्बद्वारे धुर फेकल्याची घटना घडत असतानाच संसदेच्या बाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी करताना अमोल शिंदेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला अमोल महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असून त्याने ‘तानाशाही नहीं चलेगी, भारत माता की जय, जय भीम और जय भारत’ च्या घोषणा दिल्या आहेत.


नीलम :

संसदेच्या सभागृहात स्मोक बॉम्बद्वारे धुर फेकल्याची घटना घडत असतानाच संसदेच्या बाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी करताना नीलमला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली नीलम हरयाणातील असून तिच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे. मागील अनेक वर्षांपासून नीलम विविध आंदोलनामध्ये सक्रिय असते. नीलमनेही अमोल शिंदेसोबत ‘तानाशाही नहीं चलेगी, भारत माता की जय, जय भीम और जय भारत’ च्या घोषणा दिल्या आहेत.

Video : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक; कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ

सागर शर्मा :
सागर शर्मा हा उत्तर प्रदेशातील लखनऊमधील रहिवासी असून सागर आणि मनोरंजन हे दोघे संसदेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये होते. संसदेचं कामकाज सुरु असतानाच दोघांनीही प्रेक्षक गॅलरीमधून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर आपल्या बुटात लपवलेल्या स्मोक बॉम्बद्वारे त्यांनी संसदेच्या सभागृहात धुर फेकला. त्यामुळे सभागृहात खळबळ माजली होती.

मनोरंजन :
सागर शर्मासोबत संसदेत उपस्थित असलेला मनोरंजन हा कर्नाटकातील असून तो पेशाने एक रिक्षाचालक आहे. मागील अनेक वर्षांपासून मनोरंजन रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहे. विविध आंदोलनामध्ये त्याचा सहभाग राहिला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

दरम्यान, संसदेत राडा करणारे हे चारही जण देशातील काना-कोपऱ्यातील रहिवासी असून मागील अनेक दिवसांपासून हे चौघेही संसदेत राडा करण्यासाठी नियोजन करीत असल्याचं समजंतयं. चारही जणांकडून हा प्रकार करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चारही जणांना नेमकं काय करायचं होतं? याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube