नव्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक, असा घडला ‘घटनाक्रम’

संसदेत प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारून सुरक्षा भेदली. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल्स जाळल्या. त्या दोघांना तातडीने मार्शल्सनी ताब्यात घेतलं आहे.

चार तरुणांपैकी एक जण लातूरचा अमोल धनराज शिंदे असल्याची माहिती समोर आली आहे.

या चौघांनीही म्हैसूर भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांच्यामार्फत पासेस बनवले होते.

दोघांनी लोकसभेत घुसखोरी केली तर दोघांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं करत घोषणाबाजी केली.
