मोठी बातमी ! भोंदूबाबा अशोक खरातला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Ashok Kharat : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.

Ashok Kharat

Ashok Kharat : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. लैंगिक शोषणाच्या पाचव्या गुन्ह्यात एसआयटीने अटक केल्यानंतर आज अशोक खरातला व्हिसीद्वारे नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावाणी दरम्यान अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

तर पुढच्या वेळी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जाईल तेव्हा आरोपीला न्यूरो सर्जनकडे तपासणी करण्यात यावी अशी मागणी या सुनावणी दरम्यान अशोक खराच्या वकिलांकडून करण्यात आली.

तर दुसरीकडे पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातने (Ashok Kharat) डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक टीमकडून रिकव्हर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात आल्याने अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणी दरम्यान एसआयटी काय मागणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आज पार पडलेल्या सुनावणी दरम्यान आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदर्थ पाजून आणि फसवणूक करुन आरोपीने अत्याचार केले आहेत. त्यामुळे या द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाला सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता.

World Cup 2027 पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय; अजित आगरकर ठरवणार ‘टीम इंडिया’ चे भवितव्य

तर पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहेत. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने आता पुन्हा कोठडीत वाढ नको असा युक्तीवाद अशोक खरातच्या वकिलांकडून करण्यात आला होता. मात्र पीडितांची संख्या तसेच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला.

follow us