धनंजय मुंडे हे दुसरे अशोक खरात; करुणा मुंडेंनी केला खळबळजनक दावा
महिला आयोगाच्या पद हे राष्ट्रवादीकडे परत गेले तर महिलांना न्याय मिळाणार नाही असा दावा करुणा मुंडे यांनी केला.
राज्यात अशोक खरातचं प्रकरण (Kharat) तापलेलं असतानाच आता करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळनक आरोप केला आहे. धनंजय मुंडे हे दुसरे अशोक खरात असल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
मुंडे यांनी चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. खरात प्रकरणात नेता, मंत्री कोणी का असेना त्याचं नाव समोर आलं पाहिजे, रुपाली चाकणकर यांची चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर आंदोलन करणार असा इशारा करुणा मुंडे यांनी दिला.
रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या; त्या पत्राबाबत खोडसाळपणी, चौकशी झाली पाहिजे
राज्य महिला आयोगाच्या पद हे राष्ट्रवादीकडे परत गेले तर महिलांना न्याय मिळाणार नाही असा दावा करुणा मुंडे यांनी केला. देवा भाऊंना मी एवढेच विनंती करेन यामध्ये कोणीही राजकारण करता कामा नये आणि महिला आयोगाचे पद हे योग्य व्यक्तीला दिले पाहिजे. महिला निवृत्त न्यायाधीशाला हे पद मिळायला हवे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.
रुपाली चाकणकर यांना मोठ्या नेत्यांचे पाठबळ आहे. कोण पाठबळ देते आहे, हा मोठा प्रश्न, महिलांचं कधीपर्यंत खच्चीकरण होणार , खात्यांचे व्यवहार दिसतात, एवढे फोन कॉल्स आहेत, खरातला निधी वाटप होतो. खरात याचे फोटो सगळ्या मोठ्या राजकारण्यांसोबत आहे. सगळं उघड व्हायला पाहिजे. याप्रकरणाचा मुख्य आका कोण हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.