Ashok Kharat : अचाट शक्तिवर्धक अन् कामोत्तेजक; तुर्कितील एल्विश मध कसा तयार होतो?

तुमच्या लैंगिक समस्यांवर रामबाण उपाय हवाय? मग ९ लाख रुपये काढा आणि हा 'तुर्की मध' घ्या! खरात याच दाव्यावर श्रीमंतांना लुटत होता.

  • Written By: Published:
Ashok Kharat : अचाट शक्तिवर्धक अन् कामोत्तेजक वाढवणारा तुर्कितील एल्विश मध कसा तयार होतो?

Ashok Kharat Case & Whya Turkey Elvish Honey :  तुमच्या लैंगिक समस्यांवर रामबाण उपाय हवाय? मग ९ लाख रुपये काढा आणि हा ‘तुर्की मध’ घ्या! नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच दाव्यावर श्रीमंतांना लुटत होता. चिंचुके आणि बनावट खड्यांनंतर आता या ‘एल्विश हनी’चा असा काही खुलासा झालाय की, तुमचेही डोळे पांढरे होतील. ज्या मधाचा एक थेंब मिळवण्यासाठी तुर्कीच्या ३००० मीटर खोल गुहांमध्ये जीव धोक्यात घालावा लागतो… जो मध वर्षातून फक्त एकदाच निघतो आणि ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८-९ लाख रुपये आहे. मग हा मध खरातच्या घरात आलाच कुठून? ‘एल्विश हनी’च्या नावाखाली अशोक खरातने हायप्रोफाईल नेत्यांना आणि उद्योजकांना कसा चुना लावला? आणि तुर्किच्या एल्विश मधाची किंमत लाखोंमध्ये का असते त्याबद्दल जाणून घेऊया..

हाय-टेक आर्मी ग्रेड मोबाईलमागचं काळं जाळं; अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

एल्विश मध इतका महाग का?

पण मित्रांनो, जगात ९ लाख रुपये किमतीचा मध खरंच असतो का? तर याचं उत्तर ‘हो’ आहे. जगात ‘एल्विश’ नावाचा मध सर्वात महागडा मानला जातो. पण त्या मधाचं सत्य आणि खरातचं थोतांड यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तुर्कित मिळणारा हा मध तुर्कस्तानजवळ असलेल्या काळ्या समुद्रात २५०० ते ३००० मीटर खोल असलेल्या गुहांमध्ये मिळतो. वर्षातून फक्त एकदाच आणि काही मोजके किलो उत्पादन या मधाचे होत असल्यामुळे याची किंमत साधारण ८ लाख ८५ हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आता विचार करा… जो मध घेण्यासाठी लोक स्वतः इस्तंबूलला जातात, ज्याची ऑनलाइन विक्री होत नाही, जो वर्षातून फक्त काही किलोच निघतो, तो मध नाशिकच्या या भोंदू बाबाकडे आलाच कुठून? तर, खरातने आंतरराष्ट्रीय माहिती चोरली आणि आपल्या बनावट मधाला ‘एल्विश हनी’चं नाव देऊन श्रीमंतांना चुना लावला.

भोंदूबाबा अशोक खरातची संपत्ती किती?आकडा ऐकून बसेल धक्का

एल्विश मधाचे वैशिष्ट्य काय?

तुर्कितील खोल समुद्रात मिळणाऱ्या एल्विश मधाचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ याची दुर्मिळता नाही, तर त्याचे अविश्वसनीय पौष्टिक मूल्य आहे. गडद रंगाचा आणि चवीला किंचित कडू असलेला हा मध मॅग्नेशियम, पोटॅशियम, फिनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. या पोषक तत्त्वांमुळेच त्याला एक नैसर्गिक औषधी चमत्कार म्हणून ओळख मिळाली. या मधाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विविध जुनाट आजारांपासून आराम मिळतो, असा विश्वास अनेकांना आहे. Ashok Kharat Case & Whya Turkey Elvish Honey

सर्वसाधारण मध मधमाश्या फुलांपासून बनवतात, पण सेंटॉरी हनीच्या मधमाश्या विशेष आहेत. त्या उंच ठिकाणी वाढणाऱ्या औषधी वनस्पतींमधून मकरंद गोळा करतात आणि त्यांची पोळी गुहांमध्ये बांधलेली असतात, जिथे त्या खडकांमधून आवश्यक खनिजे शोषून घेतात. अशा प्रकारे, या मधात गुहांमधील माती, दगड आणि वनस्पतींची शक्ती सामावली जाते.

तुर्कितील हा एल्विश मध हा ऑनलाइन विकला जात नाही किंवा सुपरमार्केटच्या शेल्फवरही मिळत नाही. ग्राहक अनेकदा स्वतः इस्तंबूलला प्रवास करतात, जिथे त्यांना हा मध मिळतो आणि त्याचे सेवन कसे करावे याबद्दल सविस्तर सूचना दिल्या जातात. ही संपूर्ण प्रक्रिया याला आणखी खास बनवते. पण नाशिकचा भोंदू खरात हा मध तुर्कीच्या समुद्रातील ‘खोल गुहांमधून’ आणलाय, आणि हे ‘कामोत्तेजक’ आणि ‘शक्तिवर्धक’ आहे, असा दावा करायचा पण हा मध खरोखर तुर्कीचा होता की ५०० रुपयांच्या साध्या मधात भेसळ करून केलेला विषारी गोडवा होता? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

follow us