हाय-टेक आर्मी ग्रेड मोबाईलमागचं काळं जाळं; अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

पत्रकार आणि खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 70

New shocking revelations in the Ashok Kharat case : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असतानाच, या प्रकरणाचा भांडाफोड करणारे पत्रकार आणि खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. खेमनार यांनी सांगितले की, अशोक खरातची कार्यपद्धती अत्यंत हायटेक स्वरूपाची होती. त्याच्याकडे असलेला मोबाईल हा सामान्य फोन नसून परदेशात तयार करण्यात आलेला, आर्मी ग्रेड सिक्युरिटी असलेला अत्याधुनिक डिव्हाईस होता. अशा प्रकारचे फोन साधारणपणे लष्कर किंवा उच्च सुरक्षा यंत्रणांमध्ये वापरले जातात. या मोबाईलमध्ये डेटा अत्यंत सुरक्षित असल्यामुळे तो उघडणे हे हे सामान्य तंत्रज्ञांसाठी शक्य असते.

पोलिसांनी हा मोबाईल जप केल्यानंतर त्यातील डेटा रिकव्हर करण्यात यश मिळवले. त्यानंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले. तपासादरम्यान तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले. हे व्हिडिओ कोणत्याही छुप्या कॅमेऱ्याने चित्रित केलेले नसून, स्वतः अशोक खरातनेच आपल्या मोबाईलवरून अत्याचार करतानाचे चित्रीकरण केल्याचे उघड झाले आहे.

खेमनार यांनी खरातच्या आर्थिक साम्राज्याबाबतही मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, खरातची संपत्ती 200 कोटी नसून किमान 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. मासिकमधील त्याचे राजमहालसारखे आलिशान घर, महागड्या गाड्या आणि ऐश्वर्यशाली जीवनशैली यावरून त्याची आर्थिक ताकद स्पष्ट होते. याशिवाय, त्याचे तब्बल 26 ते 27 देशांमध्ये संपर्क होते आणि तो वारंवार परदेश दौरे करत असे. मुलीच्या लग्नानंतर कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होण्याचा त्याचा प्लॅन होता, मात्र त्याआधीच पोलीस कारवाई झाली.

भोंदू बाबा अशोक खरात ठरला ‘निमित्त’; चाकणकरांच्या खुर्चीला सुरुंग नेमका लावला कुणी?

या प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय छटा देखील लाभल्या आहेत. खेमनार यांच्या दाव्यानुसार, त्यांनी या भोंदूबाबाविरोधात बातमी प्रकाशित केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांना वैयक्तिकरित्या फोन करून तो बाबा तसा नाही, तुम्ही खुलासा करा असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात सुमारे पाच मिनिटांचे संभाषण झाल्याचे देखील नमूद केले. याप्रकरणी खरातने खेमनार यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता. विशेष म्हणजे बातमीत नाव स्पष्टपणे नसताना देखील हा दावा करण्यात आला होता. तसेच महिला राज्य आयोगाने देखील पत्रकाराला नोटीस पाठवून पुरावे सादर करण्याची मागणी केली होती.

तपासातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरात महिलांना तुझे आयुष्य सुधारण्यासाठी शुद्धीकरण करावे लागे, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन करत असे आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असे. या प्रक्रियेत तो अत्यंत घृणास्पद आणि अघोरी कृत्ये करत असल्याचे आरोप आहेत. खेमनार यांच्या म्हणण्यानुसार, खरातकडे येणारे ग्राहक हे सामान्य नसून उच्चभ्रू वर्गातील होते. या आयएएस, आयपीएस अधिकारी तसेच राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांचा देखील समावेश होता. एका मोठ्या उद्योजकांकडून तब्बल 20 कोटी रुपये उकळल्याचा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे. एकूणच, अशोक खरात प्रकरण केवळ एका भोंदूबाबाच्या गुन्ह्यांपुरते मर्यादित नसून त्यामागे मोठे अर्थी, तांत्रिक आणि प्रभावशाली जाळे कार्यरत असल्याची शक्यता या खुलाशांमुळेव्यक्त होत आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

follow us