खरात प्रकरणात एकाची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात खासदारकी, आमदारकी अन् मंत्रिपद; रोहित पवारांनी समोर आणला महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम
Rohit Pawar On Sunil Tatkare : नाशिकमधील भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने संपूर्ण राज्यात
Rohit Pawar On Sunil Tatkare : नाशिकमधील भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरातची एसआयटीमार्फत चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात नाव आल्याने रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन राजीनामा द्यावा लागला आहे. तर आता या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर पोस्ट करत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत या प्रकणात फक्त एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आले असून दुसऱ्या व्यक्तीच्या घरी खासदारकी आणि मंत्रीपद असताना आता विधान परिषदेची आमदारकीही मिळाली हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम असं रोहित पवार यांनी एक्स वर म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?
सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात (Ashok Kharat) प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम…!
सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी… pic.twitter.com/6y3Obh8gvy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 5, 2026
रुपाली चाकणकरांचा खरात सोबत गुवाहाटी दौरा अन् फोटो व्हायरल
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरातच्या काही प्रकरणात राजकीय हस्तक्षेप केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 2021 मध्ये रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आणि अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केला होता. या दौऱ्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. तर आता या प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सर्वसामान्यांना दिलासा, रेपो दरात बदल नाही; RBI ची मोठी घोषणा