सुनील तटकरे भडकले, भाषणापूर्वीच पार्थ पवारांनी बैठक सोडली? राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?
Sunetra Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये
Sunetra Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये जास्तीत जागा आपल्याकडे घेण्यासाठी तिन्ही पक्ष जोर लावताना दिसत आहे. या दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी देखील घडत असल्याची माहिती समोर आली आहे. काल 26 मे रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक चांगलीच वादळी ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
माहितीनुसार, या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच जेव्हा आमच्यावर टीका होते तेव्हा पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नाही असं देखील या बैठकीत सुनील तटकरे म्हणाले. प्रत्येक वेळी टिकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवाल देखील खासदार तटकरे यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे खासदार प्रफुल पटेल मुंबईत असताना देखील या बैठकीत हजर न राहिल्याने प्रफुल पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
या बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) बोलत होते तेव्हा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असं सुनील तटकरे मंत्री भुजबळ यांना म्हणाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर या बैठकीत खासदार पार्थ पवार (Parth Pawar) देखील उपस्थित होते मात्र तटकरे यांच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार निघून गेल्याची देखील माहिती समोर आली आहे.
पुन्हा राजकीय भूकंप; मुख्यंमत्री देणार राजीनामा अन् राज्यसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज –
पक्षाची बदनामी नको- सुनेत्रा पवार
तर दुसरीकडे या बैठकीत पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंघ असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या आहे. तसेच या बैठकीत त्यांनी 22 आमदार पक्षाची साथ सोडणार या चर्चांमुळे पक्षाची बदनामी होत आहे असं म्हटलं आहे. तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असं देखील सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत स्पष्ट केलं असल्याची माहिती समोर आली आहे.