पार्थ पवार आणि कायनात धर यांचा 29 जुलैला साखरपुडा, जाणून घ्या पवार कुटुंबियांची होणारी सून कोण?

Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement : दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात

Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement

Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement : दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात धर यांचा पुण्यात 29 जुलै रोजी साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेंचा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार आणि कायनात धर देखील उपस्थित राहिली. यानंतर पार्थ पवार आणि कायनात धर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती.

कायनात धर (Kaynaat Dhar) यांचे पवार कुटुंबाशी कौटुंबिक संबंध असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तसेच यापूर्वी काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यासोबत दिसली आहे. काही महिन्यांपूर्वी कायनात धर आणि पार्थ पवार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात (Mahakal Temple) एकत्र दर्शन देखील घेतले होते. तर अजित पवार यांच्या निधनानंतर कायनात धर बारामतीत पवार कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचली होती. तसेच मुंबईत आयोजित शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही तिने हजेरी लावली होती.

पवार कुटुंबियांची होणारी सून कायनात धर कोण?

समोर आलेल्या माहितीनुसार, कायनात धर ही मूळची हरियाणाची असून सध्या ती दिल्लीत वास्तव्यास आहे. तिचे पवार कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा स्पॉट झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिने पार्थ पवार यांच्यासोबत मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शन देखील घेतले होते.

नाल्यांमुळे गंगा प्रदूषित झाली, तसा आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित : स्वामी गोविंददेव गिरी

कायनात धार ही मूळची हरियाणाची असून, सध्या ती दिल्लीत वास्तव्यास आहे. पवार कुटुंबाशी तिचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. कायनात धार ही गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा स्पॉट झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार हे दोघेही मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन आणि पूजा करताना दिसले होते. त्यांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

follow us