पार्थ पवारांना यश; पुण्यात नाराजीवर पडदा अन् सुनील टिंगेरेंची निवडणुकीतून माघार
Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी
Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेल्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. सुनील टिंगरे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज देखील दाखल केला होता. त्यामुळे आता सुनील टिंगरे बंडखोरी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्याकडून सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, जिजाई निवासस्थानी पार्थ पवार (Parth Pawar), विक्रम काकडे (Vikram Kakade) आणि सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यात चर्चा झाली असून या बैठकीत सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे म्हणाले की, पक्ष मला कुठे ही वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षावर अशा वेळ येतात जेव्हा काही निर्णय घ्यावे लागतात. संजय काकडे यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांना देखील पक्ष कार्यालयात यायचा अधिकार आहे. मी दादांचा कार्यकर्ता आहे मी शब्द पाळतो. पुढील काळात योग्य तो सन्मान राखला जाईल असं मला सांगितलं असल्याचं माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे म्हणाले. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार सुनील टिंगरे यांची नारीज दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
सुनील टिंगरेंनी बंडखोरीचे अस्त्र उपसूनही अखेर माघार का घेतली? यू-टर्न घेण्याची 5 कारणं
तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी पुण्यात सात उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाचा देखील समावेश आहे. तर प्रदीप कंद यांनी भाजपकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहे. संपूर्ण राज्यातील 17 जागांवर होणाऱ्या या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.