मोठी बातमी! संसदेचे दरवाजे बंद, आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या, मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला

संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आलं असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

Delhii

दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. (Wangchuk) संसद भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. अभिजीत दिपके संसद भवनाकडे जाण्यासाठी आग्रही आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्या फेकल्या आहेत. आंदोलकांना पांगवण्याचे काम सुरू आहे. संसदेचे मुख्य गेटही बंद करण्यात आलं आहे. दरम्यान, संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आलं असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. प्रधान यांचा राजीनामा ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे.

मी ठणठणीत मला संसद मोर्चात जायचयं, कृपया मला डिस्चार्ज द्या; वांगचुक यांचे रुग्णालयाला पत्र

कॉक्रोच जनचा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके संसद भवनाजवळ पोहोचले आहेत. अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाले. संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा पुढे निघाला. मोठा पोलिस बंदोबस्त संसद परिसरात बघायला मिळत आहे. अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी संसदेकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आहे.

हे आंदोलन आता चिघळताना दिसत आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. कडक बंदोबस्त वाढवण्यात आला. संसदेचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलकांची मोठी संख्या बघायला मिळत आहे. अभिजीत दिपके यांनी उपोषण सोडले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांना भेटण्यासाठी आता धर्मेंद्र प्रधान पोहोचले आहेत.

बंदुका रोखून तैनात

आंदोलकांनी घुसखोरी केल्यास त्यांना रोखायला बंदुकी घेऊन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. संसद भवनातील सुरक्षारक्षकांनी सीजेपीचे काही आंदोलक जवळ आल्याचे समजताच धावत जाऊन संसद मार्गावरील गेट बंद केले. त्यानंतर काही सुरक्षारक्षक या गेटच्या दिशेने बंदुका रोखून तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, आंदोलकावर पाण्याचा मारा करण्यासाठी मोठे पाईप्सही याठिकाणी आणण्यात आले आहेत. दरम्यान, हे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

follow us