Vinod Tawde Meeting With Khadse : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? महासचिव विनोद तावडेंनी घेतली भेट
Vinod Tawde Meeting With Khadse : राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Vinod Tawde Meeting With Khadse : राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. भाजपचे महासचिव आणि खासदार विनोद तावडे यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आमदार जयंत पाटील यांची भेट घेत याबाबत चर्चा देखील केली असल्यची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे आता विनोद तावडे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना ओबीसीचा प्रमुख चेहरा राहिले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांची भाजपचे (BJP) महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याशी भेट झाल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. भाजपच्या सुरुवातीच्या काळात एकनाथ खडसेंनी राज्यात भाजपची संघटना उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती मात्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता.
अनुभवी नेत्याला पुन्हा संघटनेत घेण्याची तयारी
तर दुसरीकडे विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर भाजप पुन्हा एकदा आपल्या जुन्या आणि अनुभवी नेत्याला पक्षात घेण्याची तयारी करत असल्याचं बोलले जात आहे. काही महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्याशी एकनाथ खडसे यांची भेट झाली होती. या भेटीत भाजप प्रवेशाबद्दल चर्चा झाली होती मात्र राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे खडसेंचा प्रवेश रखडला होता. तर आता विनोद तावडे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा भाजपात एकनाथ खडसे प्रवेश करणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
WWE दिग्गज ‘द ग्रेट खली’ ने जाहीर केली व्यावसायिक रेसलिंगमधून निवृत्ती
तर दुसरीकडे या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. विनोद तावडे आमच्या सूनबाई रक्षा खडसेंची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माझीही भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस केली आणि काही वैयक्तिक चर्चा झाली परंतु राजकीय चर्चा झाली नाही असं एकनाथ खडसेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.