प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राहणारच? अफवांनंतर राष्ट्रवादी नेतृत्वाची स्पष्ट भूमिका
दिल्लीतील पक्ष कार्यालयातील वाद, काही वरिष्ठ नेत्यांच्या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
Clear role of nationalist leadership : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद, दिल्लीतील पक्ष कार्यालयातील वाद, तसेच काही वरिष्ठ नेत्यांच्या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर येत पक्षात कोणताही मोठा संघर्ष नसल्याचा दावा केला. त्याचबरोबर रोहित पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप करत त्यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप केला आहे.
दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याच्या चर्चांवर अविनाश आदिक यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव असल्यामुळे अनेक महिन्यांपासून दिल्लीतील कार्यालयीन काम पाहतो. काही दिवस मी दिल्लीला गेलो नव्हतो. मात्र काळ कार्यालयात गेल्यानंतर माझ्या नावाने काही माध्यमांमध्ये चुकीची बातमी प्रसिद्ध करण्यात अली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. पक्षामध्ये अशी कोणतीही परिस्थिती नाही, असं आदिक यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी अफवा पस्रवणाऱ्यांविरोधात पक्ष कठोर भूमिका घेणार असल्याचा सांगितलं. जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. संबंधित वृत्तपत्र आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
दरम्यान, सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना देखील उमेश पाटील यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि कायम राहणार आहेत. त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पदांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पक्षाची राष्ट्रीय कमिटी नुकतीच जाहीर झाली असून भविष्यात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो राष्ट्रीय कमिटी घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पक्षांतर्गत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कथित कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. पक्षामध्ये गोंधळ निर्माण कारण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अशा लोकांवर थेट हकालपट्टीची कारवाई करण्यात येईल, असं नेत्यांनी स्पष्ट केलं.
पत्रकार परिषदेत सर्वाधिक चर्चा झाली ती आमदार रोहित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची. उमेश पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटलं की, रोहित पवार हे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्या राजकीय वारशावर दावा करण्यासाठी ते वातावरण तयार करत आहेत. अजित पवार यांचा सर्वाधिक छळ कोणी केला असेल, तर तो रोहित पवार यांनीच केला आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा प्रक्रियेशी संबंधित प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सीबीआयकडून अटक
बारामतीच्या राजकारणाचा देखील उल्लेख यावेळी करण्यात आला. बारामतीवर रोहित पवार यांचा डोळा आहे. पण बारामती ही अजित पवार यांची राजधानी होती आणि राहील, असा दावा उमेश पाटील पाटील यांनी केला. याचवेळी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील चौकशीवर देखील भाष्य करण्यात आले. अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र या प्रकरणाचं राजकारण करून काही जण स्वतःची राजकीय जमीन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करण्यात आला.
रोहित पवार यांच्यावर आणखी गंभीर आरोप करताना उमेश पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या लीगसीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अजित पवार यांच्या पक्षाची चिंता रोहित पवार यांनी करू नये. त्यांच्यां पक्षातील अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
पत्रकार परिषदेत तीन पक्षांच्या सरकारच्या काळातील घटनांचा देखील उल्लेख करण्यात आला. आनंद परांजपे यांनी पक्ष फोडण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अजितदादा हयात असतानाच काही नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी ठेवली होती, असा देखील दावा यावेळी करण्यात आला. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांच्या चर्चांदरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत पक्ष नेतृत्वाने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या थेट आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.