भोंदूबाबा अशोक खरातची संपत्ती किती?…, आकडा ऐकून बसेल धक्का…
नाशिकच्या कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरातच्या अनेक महिलांची फसवणूक प्रकरणात धक्कादाक खुलासे समोर येत आहेत.
नाशिकच्या कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरातच्या अनेक महिलांची (Kharat) फसवणूक प्रकरणात धक्कादाक खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातला अटक होण्यापूर्वी त्याची ३ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. शिर्डीतील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या अटकेच्या ३ दिवस आधी ही बैठक पार पडली. हे आयएएस अधिकारी कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
मी देव, तुझं योनी शुद्धीकरण कराव लागेल, खरातबद्दलची खळबळजनक माहिती समोर
शिर्डीमध्ये अशोक खरात आणि ज्या ३ आयएएस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती ही बैठक विनोद नावाच्या व्यक्तीने घडवून आणली होती. विनोद हा अशोक खरातचा व्यक्ती असल्याचं सांगितलं जात आहे. ही बैठक नेमकी कशासाठी घेण्यात आली होती. या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलीस सध्या या विनोदचा शोध घेत आहेत. आता या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू आहे. यातूनही आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अटक कशी केली?
या भोंदू खरातबाबाला अटक करताना पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली होती. अटक करण्यासाठी जे पथक पाठवण्यात आलं होते त्यामधील काही अधिकाऱ्यांना खरातच्या अटकेची कल्पना नव्हती. घरात चोर घुसल्याचं सांगत पोलीस रात्री खरातच्या घरात गेले आणि त्याला अटक करत पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलिसांकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे असलेल्या पेनड्राइव्हमध्ये पोलिसांनी १०० पेक्षा अधिक व्हिडीओ मिळाले आहेत.
किती संपत्ती?
खरातकडे पाथर्डीमध्ये ३० एकर जमीन असून त्याची किंमत जवळपास १५० कोटींच्या आसपास आहे. मिरगाव आणि कहांडळवाडी या ठिकाणी ४५ एकर जमीन असून त्याची किंमत २ कोटींच्या घरात आहे. ओझर विमानतळाजवळ त्यांची जमीन असून त्याची किंमत ५ कोटी इतकी आहे. गौळाणे शिवारात त्याच्या कुटुंबीयांची जमीन असून त्याची किंमत ३० कोटींच्या आसपास आहे. शिर्डीतील साई मंदिरापासून दीड किमी अंतरावर ४ एकर भूखंड असून त्याची किंमत ५० कोटींच्या आसपास आहे. कर्मयोगीनगर येथे आलिशान बंगला आणि ऑफिस असून त्याची किंमत ५ कोटी आहे. मिरगाव येथे फार्म हाऊस असून त्याची किंमत १३ कोटी आहे. अशी ही खरातची संपत्ती आहे.