‘तुमच्यावर कोप होईल’ची गर्जना देत थयथयाट; नंतर पोलिसी खाक्या दाखवताच नमला खरात

कारवाई सुरू करताच खरातने आक्रमक भूमिका घेत तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल, असा शब्दांत पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला.

  • Written By: Published:
Untitled Design 69

Ashok Kharat was arrested in a secret operation : नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेनंतर प्रकरणाला दररोज नवे आणि धक्कादायक वळण मिळत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता अटकेदरम्यान घडलेल्या घटनांचा देखील खुलासा समोर आला असून, पोलिसांना देखील खरातच्या विचित्र वर्तनाचा आणि पोकळ धमक्यांचा सामना करावा लागल्याचे उघड झाले आहे.

नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे अत्यंत गुप्त कारवाई करत अशोक खरातला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून कापत करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमधून सुरूवातीला 58 आणि नंतर तब्बल 100 व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमुळे प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली असून, तपास यंत्रणांकडून अधिक सखोल चौकशी सुरू आहे.

अटकेच्या वेळी घडलेला प्रकार देखील तेवढाच धक्कादायक होता. पोलिसांनी प्रसाद म्हणजेच पॉलिसी कारवाई सुरू करताच खरातने आक्रमक भूमिका घेत तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल, असा शब्दांत पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ कठोर भूमिका घेत त्याला समज देत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ तो संतापाच्या भरात आक्रमक वागत राहिल्याची माहिती देखील समोर आली आहे.

भोंदू बाबा अशोक खरात ठरला ‘निमित्त’; चाकणकरांच्या खुर्चीला सुरुंग नेमका लावला कुणी?

दरम्यान, अशोक खरातच्या अटकेमागील संपूर्ण ऑपरेशन ही अत्यंत नाट्यमय आणि रणनीतीपुर्वक पार पडले. नाशिक पोलिसांनी या कारवाईसाठी तब्बल पाच स्वतंत्र पथके तयार केली होती. मात्र, या पथकातील अनेक कर्मचाऱ्यांना देखील शेवटच्या क्षणापर्यंत कारवाईचे नेमके स्वरूप किंवा लक्ष्य याची माहिती देण्यात आली नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना लाठ्या, हेल्मेट आणि शिल्डसह सज्ज ठेवण्यात आले होते.

विशेष म्हणजे, एफआयआर नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. ऐनवेळी घटनास्थळी पोहोचल्यानंतर घरात चोर शिरल्याचा बनाव रचत पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि अशोक खरातला ताब्यात घेतले. ऑपरेशन कॅप्टन खरात म्हणून ओळखल्या गेलेल्या या कारवाईत पोलिसांनी दाखवलेली गुप्तता आणि अचूक नियोजन यामुळे संपूर्ण अटकेचा थरार अधिकच वाढला. सध्या जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू असून, या प्रकरणातून आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us