मी देव…, तुझं योनी शुद्धीकरण कराव लागेल, खरातबद्दलची खळबळजनक माहिती समोर

कॅप्टन खरात हा महिलांना संमोहित करुन किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा, अशी चर्चा आहे.

Kharatt

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने 200 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केलं असावं, असा अंदाज ‘खबरदार पुढारी’ दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी व्यक्त केला. (Kharat) अशोक खरात याने शारीरिक अत्याचार केलेल्यांपैकी बहुतांशी महिला या उच्चशिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असल्याचा दावाही खेमनार यांनी केला आहे.

कॅप्टन खरात हा महिलांना संमोहित करुन किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा, अशी चर्चा आहे. मात्र, दत्तात्रय खेमनार यांनी या प्रकरणात एक धक्कादायक उलगडा केला. अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या अनेक महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील होत्या. अशोक खरात या महिलांना म्हणायचा की, ‘मी देव आहे. तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल. त्यासाठी तो महिलेला स्वत:चं मुत्र प्यायला लावायचा’, असा खळबळजनक दावा दत्तात्रय खेमनार यांनी केला आहे.

Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?

एका व्यावसायिकाला धंद्यात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनसाठी अशोक खरात याच्याकडे आला होता. त्याला खरातने खोटी रत्नं देऊन फसवलं. त्याला आधी साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकलं. दुसरं रत्न दोन लाखांना विकलं. पण ही दोन्ही रत्नं खोटी निघाल्याचं नंतर या व्यावसायिकाच्या लक्षात आलं. याशिवाय, अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री-पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध जुळवून दिले. नंतर ती महिला ‘प्रेग्नंट’ (गर्भवती) असल्याचं खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातने त्याच्याकडून 20 कोटी रुपये उकळले, असंही खेमनार यांनी सांगितलं आहे.

अशोक खरात हा महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याला शक्तीवर्धक गोळ्यांचं पाणी द्यायचा. ते पाणी बाटलीत भरुन देत असे. ते पाणी म्हणजे ओशनो जल आहे. हे पाणी प्यायल्यास तू एनर्जिटीक राहशील, तब्येत चांगली राहील. भविष्यात तुला खूप ताकद येईल, असे सांगून अशोक खरातने या मंत्र्याला गंडवले, अशी माहितीही दत्तात्रय खेमनार यांनी दिली आहे. अशा अनेक माहितीनंतर एकच खळबळ उडाली आहे. या खरातचे रोज नवे नवे कांड बाहेर येत असल्याने वेगवेगळी चर्चा रंगली आहे.

follow us