‘हे चुकीचंच, मनोरंजनाला फाशी द्या…’, संसदेत सुरक्षा भंग करणाऱ्या मनोरंजनच्या वडिलांची प्रतिक्रिया
Security Breach in Lok Sabha: लोकसभेत आज शून्य प्रहर संपण्याच्या काही मिनिटं आधी दोन तुरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या आणि पिवळ्या रंगाचा धुर स्मोक कॅनमधून (Smoke can) सगळीकडे पसरवला. या घटनेमुळं संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे संसदेचे कामकाजही तहकूब करण्यात आलं होतं. यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून सागर आणि मनोरंजन अशी या दोन तरुणांची नावे आहेत. मनोरंजन हा म्हैसूरचा रहिवासी असून आपल्या मुलाचे कृत्य लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी फाशीची मागणी केली.
Gautami Patil : ‘मला आरक्षण हवंय’; मराठा आरक्षणावर गौतमी पाटील बोलली…
आरोपी तरुणाची ओळख पटल्यानंतर दिल्ली पोलिसांनी म्हैसूर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती म्हैसूर पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर म्हैसूर पोलिसांनी विजयनगर येथील मनोरंजनाचे घर गाठले आणि चौकशी सुरू केली. एसीपी गजेंद्र प्रसाद आणि विजयनगर पीआय सुरेश यांनी मनोरंजनचे वडील देवराज गौडा यांच्याकडून मनोरंजनची माहिती घेतली.
आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळून जाणार : SIT च्या घोषणेनंतर राणेंचा मोठा दावा
आपल्या मुलाचा हा कारनामा समजल्यानंतर मनोरंजनच्या वडिलांनी मुलाने केलेल्या कृत्याचा निषेध केला आणि असे व्हायला नको होते, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, मनोरजंनने बीईचे शिक्षण घेतले आहे. एचडी देवेगौडा यांच्यामुळेच मुलाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. तो नेहमी दिल्लीला जायचा. आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. त्यांने हे कृत्य का केलं माहिती नाही. त्याचं हे कृत्यू चुकीचे आहे, कोणीही असं काही करू नये, असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
पुढं बोलतांना ते म्हणाले की, माझ्या मुलाने काही चांगलं केलं असेल तर मी त्याला नक्कीच पाठिंबा देतो. पण जर त्याने काही चूक केली असेल तर मी त्याचा तीव्र निषेध करतो. जर त्याने गदारोळ घातला असेल आणि चुकीचं कृत्य केलं असेल तर त्याला फाशी द्या, असं ते म्हणाले.
व्यवसायाने अभियंता असलेले मनोरंजनने बुधवारी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारल्या आणि पिवळ्या रंगाचा धूर सोडला. त्याच्यासोबत सागर शर्मा हा देखील होता. म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने जारी केलेल्या व्हिजिटर पासवर ते संसदेत पोहोचल होते.
मनोरंजन हा (३५) हे कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहेत. त्याने बेंगळुरू येथील विवेकानंद विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
झिरो अवर सुरू असताना दुपारी एकच्या सुमारास या दोघांनी लोकसभेत घुसखोरी केल. त्यांनी ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणाही दिल्या, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे चौघेही एकमेकांना ओळखत होते. ते सोशल मीडियावर एकमेकांशी कनेक्ट झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कटात एकूण सहा जणांचा सहभाग होता. दोन जणांनी सभागृहात गोंधळ घातला, तर दोन जणांनी बाहेर गोंधळ घातला. दोन संशयित सध्या फरार असून, अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.
सूत्रांनी सांगिलते की, दिल्लीबाहेरून आलेले पाचही लोक ललित झा नावाच्या व्यक्तीच्या घरी गुरुग्राममध्ये एकत्र राहिले होते.