Gautami Patil : ‘मला आरक्षण हवंय’; मराठा आरक्षणावर गौतमी पाटील बोलली…
Gautami Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आरक्षणाची धग कायम ठेवली तर दुसरीकडे विधी मंडळाच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणावरुन चांगलंच वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता नृत्यांगणा गौतमी पाटीलनेही (Gautami Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. सर्वांना आरक्षण मिळायला हवं, मलाही आरक्षण हवं असल्याचं उत्तर गौतमी पाटीलने दिलं आहे. ‘घुंगरु’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गौतमीने माध्यमांशी संवाद साधला आहे.
मोदी-शहांनी मुख्यमंत्री केलेले भजनलाल शर्मा यांचे हे किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील….
गौतमी पाटील म्हणाली, सर्वांनाच आरक्षण मिळायला हवं, मलाही कुणबी दाखला मिळाला पाहिजे, मला आरक्षण हवं असल्याचं स्पष्ट मत गौतमी पाटीलने मांडलं आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील जातीच्या मुद्द्यावरुन राज्यभरात चांगलीच ट्रोल होताना दिसून येत होता. राज्यातील काही मराठा संघटनांकडून गौतमी पाटील ही पाटील नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतमी पाटील चांगलीच प्रकाझोतात आली आहे.
लाईव्ह सामन्यात वीज पडली; एका खेळाडूचा मृत्यू, सहा जण जखमी
या प्रकरणावर बोलताना गौतमी पाटीलने मी मराठा असल्याची कबुली दिली होती. एवढंचं नाहीतर गौतमी पाटीलच्या वडिलांनीही आम्ही मराठा असल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. त्यामुळे आता गौतमी पाटीललाही मराठा कुणबीचा दाखल मिळावा, अशी मागणी गौतमीने यावेळी केली आहे.
अद्याप मुलगा पाहिला नाही…
मागील काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलला पत्र लिहुन लग्नाची मागणी करण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली, मी जेव्हा लग्न करेन तेव्हा मी सांगेन. आत्ता माझ्या डोक्यात लग्नाचा काही विचार नाही. अद्याप मुलगा पाहिलेला नाही, पाहिला की मी सांगणार असल्याचं गौतमीने सांगितलं आहे.
‘रात्री अर्ध्या रात्री’ लावणी करत नाही…
रात्री अर्ध्या रात्री गाण्यावर अश्लिल नृत्य सादर केल्याप्रकरणी गौतमी पाटील चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. अनेकांनी तिच्या या नृत्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मी या लावणीवर नृत्य करीत नसून मी इतर गाण्यांवर नृत्य सादर करीत असल्याचं तिने सांगितलं आहे.
दरम्यान, गौतमी पाटीलने राज्यभरात एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिल्याने आता गौतमी पाटीलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. कलाकारांच्या जीवनावर आधारित गौतमीचा पहिलाचं ‘घुंगरु’ (Ghungru Movie) हा चित्रपट येत्या 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल माहिती देताना ‘घुंगरु’ चित्रपटात गौतमी पाटील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.