हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Prime Minister Modi यांनी देशवासियाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा 77 व प्रजासत्ताक दिन आहे.

PM Modi Live (1)

Prime Minister Modi wishes the countrymen a happy Republic Day : आज 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा 77 व प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्या दिवशी दिल्लीतील कर्तव्यपथावर लष्करी पथसंचलन होणार आहे. त्या अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

प्रजासत्ताक दिन आपल्या स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाही मुल्यांचं सशक्त प्रतिक आहे. हे पर्व आपल्याला एकजुटीने राष्ट्र निर्मितीच्या संकल्पसोबत पुढे जाण्याची उर्जा आणि प्रेरणा देतो. असं म्हमत त्यांनी देशवासियाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर करत संस्कृतमध्ये देखील शुभेच्छा दिल्या. पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः। अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥

महाराष्ट्र पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव; राज्यातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदकं जाहीर

follow us