Ajit Pawar : ‘सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं’; अजितदादांनी सांगितलं पडद्यामागचं पॉलिटिक्स

Ajit Pawar : ‘सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं’; अजितदादांनी सांगितलं पडद्यामागचं पॉलिटिक्स

Ajit Pawar : राष्ट्रवादीत बंड पुकारून अजित पवार सत्तेत (Ajit Pawar) सहभागी झाले. या घटनेला आता पाच महिने उलटून गेले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या आणखी काही आमदारांनाही सत्तेत वाटा मिळाला. मोठी खाती मिळाली. अजितदादा स्वतः अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. आता त्यांनीच अर्थ खात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने अजित पवार यांच्या बंडखोरीमागे काय वाटाघाटी झाल्या याची माहिती समोर आली आहे. सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं अशी माहिती अजित पवार यांनी दिली. अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांनी हा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस यांना अर्थखातं स्वतःकडेच हवं होतं. मात्र आपल्या आग्रहामुळे अर्थखातं मिळालं. त्याचबरोबर शरद पवारांनी (Sharad Pawar) आता आराम करावा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

शरद पवार यांनी घरी बसून आराम करावा. आम्ही सुद्धा त्यांना हेच सांगत होतो. पण ते ऐकत नव्हते. त्याला आम्ही तरी काय करणार असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता अजित पवार शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं पाहिजे अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे आपण मांडली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनाही अर्थखातं त्यांच्याकडेच राहावं असं वाटत होतं. परंतु, माझ्या आग्रहामुळं अर्थखातं मला मिळालं. परंतु, फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार ते वरिष्ठ असल्याने सुरुवातीला फाइल माझ्याकडे येईल त्यानंतर फडणवीस यांच्याकडे जाईल आणि नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाईल, असा निर्णय झाला. तशी माझी भूमिका होती असे अजित पवार म्हणाले.

Sharad Pawar : ईडीने किती मजले ताब्यात घेतले?; पटेलांच्या पुस्तकासाठी पवारांनी सुचवला ‘चॅप्टर’

विलासराव देशमुख सर्वात चांगले मुख्यमंत्री 

2014 मधील लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार होती. त्यांच्या ऐवजी राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात किंवा हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करण्याचा काँग्रेसचा विचार होता. काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर चर्चाही केली होती. पण डाव उलटला. चव्हाण यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवली. सर्वात चांगले मुख्यमंत्री कोण असतील तर ते विलासराव देशमुख होते, असे अजित पवार म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज