Devendra Fadanvis : एकाच व्यासपीठावर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी; फडणवीसांचा मुंडे बंधु-भगिनीला सल्ला

Devendra Fadanvis : एकाच व्यासपीठावर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी; फडणवीसांचा मुंडे बंधु-भगिनीला सल्ला

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आपल्या भाषणा दरम्यान एक सल्ला दिला. ते म्हणाले की, आज या व्यासपीठावर पंकजा ताई आणि धनंजय मुंडे पण आहेत. त्यानिमित्ताने मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो. की, असेच एका व्यासपीठावर राहा. असा सल्ला फडणवीसांनी मुंडे बंधु-भगिनीला सल्ला दिला आहे. ते आज (5 डिसेंबर) बीडमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिणी भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या.

फडणवीसांचा पंकजा अन् धनंजय मुंडेंना सल्ला…

आजच्या (5 डिसेंबर) शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये कृषीमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते असलेले धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिणी भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. यावेळी भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि इतके दिवस त्यांचे विरोधक असलेले धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी फडणवीसांनी त्यांची नाराजी दूर करत दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला.

कमलनाथ यांचे दोन हट्ट पुरविणे अंगलट! ‘इंडिया’ आघाडीला सुरुंग, काँग्रेसचेही वजन घटले!

आपल्या भाषणामध्ये फडणवीसांनी हा विषय छेडला ते म्हणाले की, आज या व्यासपीठावर पंकजा ताई आणि धनंजय मुंडे पण आहेत. त्यानिमित्ताने मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो. की, असेच एका व्यासपीठावर राहा. आमच्या तिघांची म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजित पवार ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की, परळी असेल बीड असेल काहीही पायाहायची गरज नाही. ताई आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. तसेच तुम्ही जर एकत्र राहिलात तर परळी बीड आणि महाराष्ट्राचं कल्याण होईल. त्यामुळे हा मंच असाच आम्हाला दिसत राहिलं हा विश्वास व्यक्त करतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Dcm Ajit Pawar : ‘राजकीय जीवनात कोणीही कायमचा शत्रू नसतो’

दरम्यान यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, कार्यक्रमाच्या स्टेजकडे पाहून गर्मी उकाडा वाढला कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)हे एकाच मंचावर आले आहेत, असं म्हणत राजकीय टोलेबाजी केली. त्याचवेळी गर्मीचा पारा जास्त वाढला आहे, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकाच मंचावर आहेत, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चौफेर टोलेबाजी केली.

तसेच त्यांनी असंही म्हटलं की, परळीच्या विकासासाठी आपली कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी आहे. बीडची एक कन्या म्हणून या मंचावर आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खासदार प्रितम मुंडे या ठिकाणी नसल्याने आपण या मंचावर आल्याचेही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube