राजकीय जीवनात कोणीच कायमचा शत्रू नसतो; मुंडेंच्या होमग्राउंडवर अजितदादांचा धनुभाऊंना सल्ला

राजकीय जीवनात कोणीच कायमचा शत्रू नसतो; मुंडेंच्या होमग्राउंडवर अजितदादांचा धनुभाऊंना सल्ला

Ajit Pawar News : राजकीय जीवनात कोणीही कायमचा शत्रू नसतो, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar News) यांनी केलं आहे. बीडमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Cm Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), भाजप नेत्या पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

आधी बड्या नेत्यांची पाठ, आता बैठक रद्द करण्याची नामुष्की; काँग्रेसच्या पराभवाने ‘इंडियाला’ घरघर!

अजित पवार म्हणाले, बीडच्या पाणीप्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना आखली असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. विरोधाला विरोध करुन चालणार नाही, राजकीय जीवनात कुणीही कायमचा शत्रू नसतो, शेवटी राज्याचा विकास महत्वाचा असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

इंडिया आघाडीत मिठाचा खडा, ममता बॅनर्जींनी केला काँग्रेसवर हल्लाबोल

तसेच पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्विकारलं. मोदींसारखं नेतृत्व मिळत नाही. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, कधी-कधी बातम्या येतात की महायुतीतमध्ये मतभेद आहेत. पण आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

‘धनंजय मुंडेंनी काकांसोबत जे केलं ते जगाला माहिती’; रोहित पवारांनी कडक शब्दांत सुनावलं

इतरांच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही…
राज्यात सध्या मराठा, धनगर, आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. तुम्ही तुमच्या मागण्या करु शकता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मराठा आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचंही अजितदादांनी ठणकावून सांगितलं आहे. जातीजातींत भांडणं लावण्याचं आम्हाला शिकवलं नाही. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

MP Election 2023 : शिवराज सरकारचा गड आला पण सिंह गेला, वादग्रस्त गृहमंत्र्यांना मतदारांचा झटका

दरम्यान, राज्यात सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहे. महायुतीकडून विविध जिल्ह्यांतील मतदारसंघात चाचपणी करण्यात येत आहे. बीडमध्ये आज आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार उभं असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube