पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचा ते चत्मकार करू शकतात; बच्चू कडूंचा जानकरांना खोचक टोला

  • Written By: Published:
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचा ते चत्मकार करू शकतात; बच्चू कडूंचा जानकरांना खोचक टोला

Bacchu kadu On Mahadev Jankar : पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये एकाकी पडल्या आहेत. पण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मात्र पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहेत. त्यासाठी महादेव जानकर हे भाजपच्या नेत्यांनाही अंगावर घेत आहेत. त्यात आता महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेताना एक मोठे विधान केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे 145 आमदार निवडून आले तर मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेल, असे विधान जानकरांनी केले होते. त्याला आता आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी खोचक टोला लगावला आहे.

‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय’; विखेंची घणाघाती टीका

महादेव जानकर आमदार आहेत का ? विधानपरिषदेत नाही वाटतंय, असे बच्चू कडू म्हणाले. महादेव जानकर हे विधानपरिषदेचे आमदार असल्याचे पत्रकारांनी बच्चू कडू यांना आठवण करून दिली. ते चमत्कार करू शकतात, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. छगन भुजबळांबाबत कडू म्हणाले की, छगन भुजबळ हे काँग्रेस व भाजपला मागे टाकत आहे. छगन भुजबळ वरिष्ठांशिवाय बोलत नाहीत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहेत. ओबीसी नेते फक्त छगन भुजबळ असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.


‘ताबेयुक्त, दहशतयुक्त, खड्डेयुक्त वाढदिवसाच्या…’, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून विखेंना खोचक शुभेच्छा>

काय म्हणाले होते जानकर ?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानले आहे. या नात्याने पंकजा या माझ्या बहिण आहेत. आमच्या पक्षाचे जर 145 आमदार निवडून आले तर मी माझ्या बहिणीलाच मुख्यमंत्री करेन अशी घोषणा त्यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आपण भारतीय जनता पक्षाबरोबर आलो होतो मात्र, मुंडे याच्या जाण्याने मी पोरका झालोय. मात्र आगामी काळात भाजपला त्यांची जागा दाखवून देणार आहे. माझा पक्ष हा आगामी काळात भाजपमध्ये विलीन करण्याचे षडयंत्र रचले जात असले तरी ते आपण होऊ देणार नाही. आगामी निवडणुकीत स्वबळावर सर्व जागा लढवणार असून भाजपाबरोबर जाणे ही सर्वात मोठी चूक होती, असे जानकर म्हणाले होते.

https://youtu.be/WGXttRYwSoE?si=NLzm_Yx0OXTLRq8p

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube