‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय’; विखेंची घणाघाती टीका

  • Written By: Published:
‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय’; विखेंची घणाघाती टीका

अहमदनगर – मुद्दा कोणताही असो यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय टीका टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक निशाणा साधला. महाराष्ट्रातील पनवती दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहे, असं वक्तव्य करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली होती. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भाष्य केले आहे. राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, अशा शब्दात विखेंनी राऊत यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.

‘छगन भुजबळ अन् अजित पवारांची एकच भूमिका’; बच्चू कडूंचं मोठं विधान 

खासदार सुजय विखे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम नगर शहरातील विळद येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, संजय राऊत बद्दल प्रसार माध्यमांना काय एवढी रुची आहे. राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. दरम्यान राऊतांकडून सध्या भाजपच्या नेतेमंडळींवर जोरदार हल्लबोल केला जातो आहे. यातच भाजपचे पदाधिकारी बावनकुळे यांच्या एका व्हायरल व्हिडीओवरून राऊत यांनी सध्या भाजपवर जोरदार टीका केली आहे. यातच नगरमध्ये भाजपचे मंत्री विखे यांना यावर प्रश्न करण्यात आले असता त्यांनी राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका केली.

धनगर आंदोलनाला हिंसक वळण, अदृश्य हात कुणाचा? कारवाईसाठी पडळकरांचं थेट फडणवीसांना पत्र 

दूध दराबाबत विखे म्हणाले…
राज्यात सध्या दुधाच्या दरावरून आंदोलने केली जाऊ लागली आहे. अनेक ठिकाणी दुधाच्या दरावरून शेतकरी आक्रमक होताना दिसून येत आहे. यावरही विखे यांनी भाष्य केले आहे. विखे म्हणाले, हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. सध्या दुधाची आवक प्रचंड आहे. पूर्वी दूध पावडर किंवा बटरमध्ये कन्वर्जन करायचे त्याचे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचे भाव कोसळल्यामुळे त्याची निर्यात पूर्णपणे थांबून गेली आहे. निर्यातीला जर आपण प्रोत्साहन देऊ शकलो आणि कन्वर्जनला जर संधी मिळाली तर भाव वाढण्यात मदत होईल. आज भेसळीचे प्रमाण वाढले आहे. मात्र आपण भेसळयुक्तचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाला कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. याचा फायदा दूध दर वाढीसाठी मदत होईल अशी आशा महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी व्यक्त केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी भुजबळांनाही फटकारलं. ते म्हणाले की, भुजबळांनी जो ओबीसींचा उठाव केला. त्याची गरज नव्हती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका सरकारने स्वीकारली असती तर हा उठाव ठीका होता. मात्र कुणीतरी आरक्षण मागत आहे, त्याला विरेध करण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभ करणं हे योग्य नाही, असं विखे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube