धनगर आंदोलनाला हिंसक वळण, अदृश्य हात कुणाचा? कारवाईसाठी पडळकरांचं थेट फडणवीसांना पत्र

धनगर आंदोलनाला हिंसक वळण, अदृश्य हात कुणाचा? कारवाईसाठी पडळकरांचं थेट फडणवीसांना पत्र

Dhangar Reservation : जालना येथील धनगर आरक्षण आंदोलनाला (Dhangar Reservation) हिंसक वळण लागले. या प्रकरणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. या मुद्द्यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आमदार पडळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

ते म्हणाले, धनगर समाज शांतताप्रिय आहे. या समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका घेतली. 21 नोव्हेंबर रोजी आंदोलन होतं. त्यानंतर निवेदन देण्याचा कार्यक्रम होता. जालना जिल्ह्यातल्या समाजबांधवांनी मोर्चाचं नियोजन केलं होतं. मोर्चाच्या आदल्या दिवशी काही मंडळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटली. त्यावेळी तुमचे निवेदन स्वीकारायला येतो असे जिल्हाधिकारी म्हणाले होते. जेव्हा मोर्चा तिथं गेला. हजारोंच्या संख्येने लोकं गेले. एक तास तिथं उन्हात थांबले पण अधिकारी दाद द्यायला तयार नाहीत. म्हणून मी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे त्यात म्हटलं आहे की धनगर समाज किंवा मी हिंसेचं समर्थन कधीच करत नाही. हिंसेचा आम्ही निषेधच करतो. परंतु, हिंसेला कुणी भाग पाडलं याची चौकशी झाली पाहिजे.

Dhangar Reservation : निवदेन घ्यायला कोणी आलंच नाही म्हणूनच..,; दगडफेक प्रकरणावर पडळकर बोलले

धनगर समाजाबरोबर असंवेदनशीलपणे वागणारे तिथले जिल्हाधिकारी असतील त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर पोलिसांकडून जो एफआयआर दाखल झाला त्यात 36 लोकांची नावं होती धक्कादायक म्हणजे त्यात नसणाऱ्या सहा लोकांची नावं घातली. मग हे नेमकं कोण करतंय? कुणाचा अदृश्य हात यामागं आहे? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी गृहमंत्र्यांना केल्याचे पडळकर म्हणाले. धनगर समाजाच्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे महाराष्ट्र अशांत करण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न तर नाही ना. म्हणून मी गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे पडळकर म्हणाले.

धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, पण मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी येण्यासाठी उशीर करीत आहेत, असा आरोप करत आंदोलक संतप्त झाले. या संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली.

पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ;.. पडळकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube